महाराष्ट्र

जुन्नरमधील शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या लहानग्यांच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला मदतीचा हात

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉल करून केले मृत मुलांच्या कुटुबियांचे सांत्वन

पुणे: शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्या आफान अफसर ईनामदार ( वय १०) आणि रीफत अफसर ईनामदार ( वय ७) या चिमुकल्यांच्या कुटुंबियांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच लाख रुपयांची मदत देऊ केली आहे. नगरपालिका निवडणुकीवेळी जुन्नरमध्ये पचारासाठी आले असता त्यांना या दुर्दैवी घटनेबद्दल कळल्यानंतर त्यांनी ईनामदार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली होती. त्यानंतर आता त्यांनी त्यांना मदतीचा हात देऊ केला आहे.

जुन्नरमध्ये २२ नोव्हेंबर रोजी घडलेल्या दुर्वेवी घटनेत अफसर इनामदार यांची दोन्ही मुले खेळत असताना शेततळ्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने पूर्ण जुन्नर तालुका हळहळला, त्याच वेळी १ डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी जुन्नर येथे गेले असता स्थानिक शिवसेना नगरसेवक मयुर महाबरे यांनी ही घटना आमदार शरद सोनवणे यांना सांगितली. त्यांनी तत्काळ उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कानावर ही बाब घातली. यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रचारातून वेळात वेळ काढून ईनामदार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना मदतीचे आश्वासन दिले.

त्यानुसार काल ६ फेब्रुवारी रोजी शिवसेनेच्या वतीने आमदार शरद सोनवणे, शिवसेना सचिव राम रेपाळे आणि युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण, स्थानिक नगरसेवक मयुर महाबरे आणि स्थानिक शिवसैनिकांनी ईनामदार कुटुंबाची भेट घेऊन पाच लाखांची ही मदत त्यांना सुपुर्द केली.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधून इनामदार कुटुंबीयांचे सांत्वन केले. झालेली घटना दुर्दैवी असून स्वतःची मुले गमावण्याचे दुःख काय असते ते मला चांगले

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

3 तास ago

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

10 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago