महाराष्ट्र

प्रवीण दरेकर यांचे वक्तव्य दुर्दैवी व राजकीय संस्कारशून्य; राष्ट्रवादी काँग्रेसचा तीव्र निषेध

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. शरद पवार साहेब तसेच पवार कुटुंबीयांबाबत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी, बेजबाबदार आणि राजकीय संस्कारशून्य आहे. अशा विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र शब्दांत निषेध करीत आहे.

पार्थ पवार हे शरद पवार साहेबांना केवळ कुटुंबीय म्हणून भेटतात, असे विधान करून दरेकर यांनी केवळ एका कुटुंबावर नव्हे, तर महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना आणि विश्वासावरच आघात केला आहे. पवार कुटुंबीयांनी गेली अनेक दशके राज्याच्या विकासासाठी, शेतकरी, कामगार, युवक आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अहोरात्र कार्य केले आहे. त्यांच्या योगदानाचा अवमान करणे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या विश्वासाचा अपमान होय.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, अजितदादा पवार यांसारखे सक्षम, अनुभवी आणि अभ्यासू नेतृत्व भक्कमपणे उभे आहे. त्यामुळे अशा निराधार, तथ्यहीन वक्तव्यांमुळे पक्षाची ताकद कमी होणार नाही. उलट, अशा विधानांतून दरेकर यांची राजकीय हतबलताच जनतेसमोर स्पष्ट होत आहे.

स्वतःच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आणि अपयश झाकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. मात्र महाराष्ट्राची जनता सर्व काही पाहत आहे आणि योग्य वेळी योग्य उत्तर देईल, याची आम्हाला खात्री आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एसआरएतील अनियमिततेप्रकरणी विकासकांवर कारवाई; रॉयल पामच्या विकासकाविरोधात गुन्हा दाखल

खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…

55 मिनिटे ago

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

8 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago