महाराष्ट्र

आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल

पोलीस प्रशासनाला तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश

सांगली: सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील सनमडी येथील समाजकल्याण विभागाच्या आश्रमशाळेत अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या संतापजनक घटनेची उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. डॉ. गोऱ्हे यांनी राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, समाजकल्याण आयुक्त आणि सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदन सादर करून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 26 एप्रिल २०२५ रोजी उघडकीस आलेल्या या प्रकरणात, शाळेच्या मुख्याध्यापकावर अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे.

या घटनेसंदर्भात उपसभापती, विधानपरिषद कार्यालयाने श्रीमती रितु खोकर, जिल्हा पोलीस अधीक्षक, सांगली, एपीआई, उमदी पोलीस स्टेशन तथा तपास अधिकारी श्री संदीप कांबळे, श्रीमती धनश्री भांबूरे, सह संचालक, समाजकल्याण, श्रीमती प्रियंका माने, माहिला व बालविकास अधिकारी व ईतर वरिष्ठ अधीकार्यांशी संपर्क साधुन घटनेबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना अवगत करुन दिले.

डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या निवेदनात मुख्याध्यापकाविरुद्ध तातडीने कठोर कारवाई करून जलद न्यायप्रक्रिया राबविण्याची मागणी केली आहे. घटनेत मदत करणाऱ्या अथवा सहभागी कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यास सांगितले आहे. याशिवाय, घटना दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. पीडित विद्यार्थिनींना समुपदेशन, कायदेशीर मदत व पुनर्वसनासाठी विशेष सल्लागार समिती स्थापन करण्याची आणि सर्व आश्रमशाळांमध्ये सुरक्षिततेसाठी उपाययोजना करून त्याचा अहवाल सादर करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी नियमित चौकशी व निरीक्षण मोहिमा राबवाव्यात, असेही त्यांनी सुचवले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

7 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

21 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago