महाराष्ट्र

दिव्यांग भिकाऱ्याकडे कोट्यवधींची मालमत्ता; इंदूरमधील भिकाऱ्याचा थरारक पर्दाफाश

इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूर शहरातून भिक्षावृत्तीबाबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सराफा बाजार परिसरात भीक मागणाऱ्या एका दिव्यांग भिकाऱ्याकडे चक्क तीन पक्की घरं, तीन रिक्षा आणि एक कार असल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. मांगीलाल असं या भिकाऱ्याचं नाव असून, महिला व बालविकास विभागाच्या बचाव पथकाच्या कारवाईत ही माहिती उघडकीस आली.

सराफा बाजार परिसरात मांगीलाल सर्वपरिचित होता. लाकडी गाडीवरून फरफटत चालणं, पाठीवर पिशवी आणि हातात चपला घेऊन अत्यंत असहाय अवस्थेत फिरणं, यामुळे अनेकांची त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण होत असे. तो कोणावरही दबाव टाकत नसे किंवा मोठ्या आवाजात भीक मागत नसे. त्यामुळे त्याची शारीरिक अवस्था पाहून लोक स्वतःहून त्याला पैसे देत असत.

तपासादरम्यान असे समोर आले की, मांगीलालच्या अपंगत्वामुळे शासनाकडून त्याला रेडक्रॉस सोसायटीमार्फत यापूर्वीच १ बीएचके घर देण्यात आले होते. काही काळ तो आश्रमातही वास्तव्यास होता. मात्र, सर्व सुविधा उपलब्ध असूनही त्याने भीक मागणं हेच उत्पन्नाचं साधन बनवलं.

रेस्क्यू टीमने केलेल्या चौकशीत मांगीलालकडे भगतसिंग नगरमध्ये १६×४५ फुटांची तीन मजली इमारत, शिवनगर भागात ६०० स्क्वेअर फुटांचं घर आणि अलवास भागात १ बीएचके घर असल्याचं निष्पन्न झालं. या सर्व मालमत्तांची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचं सांगितलं जात आहे.

इतकंच नाही तर मांगीलालकडे स्वतःच्या तीन रिक्षा असून त्या भाड्याने चालवल्या जात आहेत. तसेच त्याच्याकडे ‘डिझायर’ कारही आहे, जी तो स्वतः वापरत नसून भाड्याने देऊन त्यातून कमाई करतो.

चौकशीत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मांगीलाल हा केवळ भीक मागत नव्हता, तर सावकारीचाही व्यवसाय करत होता. सराफा बाजार परिसरातील अनेक लोकांना त्याने व्याजाने पैसे दिल्याचं त्याने कबूल केलं आहे. तो रोज भीक मागण्यासोबतच व्याजाची वसुली करण्यासाठीही बाजारात जात असे. भीक आणि व्याजाच्या माध्यमातून तो दररोज ४०० ते ५०० रुपये कमवत असल्याची माहिती आहे.

दरम्यान, कारवाईदरम्यान मांगीलालने आपली बाजू मांडताना सांगितलं की, तो कोणाकडेही जबरदस्तीने पैसे मागत नाही आणि लोक स्वेच्छेने त्याला मदत करतात. मात्र, प्रशासनाच्या मते, संपन्न असूनही खोटा असहायपणा दाखवून भीक मागणं हा कायद्याने गुन्हा आहे.

नोडल अधिकारी दिनेश मिश्रा यांनी सांगितलं की, मांगीलालविरोधात सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. त्याच आधारावर भिक्षावृत्ती निर्मूलन मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

42 मिनिटे ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

47 मिनिटे ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

53 मिनिटे ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

57 मिनिटे ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

6 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

7 तास ago