मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क अंतर्गत सहाय्यक व लिपीक आणि टंकलेखक या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. टंकलेखनच्या या ऑनलाईन परिक्षेत काही विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मात्र ही टंकलेखन कौशल्य चाचणी परिक्षाच रद्द करुन पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या टंकलेखन कौशल्य चाचणी परिक्षेत ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचण आली त्यांचीच फेरपरीक्षा घ्यावी सर्वांचीच फेर परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना पत्र लिहिले असून या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, टंकलेखन कौशल्य चाचणी परिक्षेत ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचण आली त्याच विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याऐवजी सरसकट सर्वांची पुन्हा परीक्षा घेणे हे विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे. ज्या विद्यार्थ्यांना परिक्षेत तांत्रिक अडचण आली नाही त्यांना पुन्हा परीक्षा देण्यास सांगणे चुकीचे व अन्यायकारक आहे. तांत्रिक अडचणींची शिक्षा त्या विद्यार्थ्यांना कशासाठी दिली जात आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अडचण आली होती त्यांची फेरपरीक्षा घ्या व इतर यशस्वी विद्यार्थ्यांची यादी जाहीर करावी असे पटोले म्हणाले.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…