शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील ऊस तोड ठेकेदारास ऊस तोडणीसाठी कामगार पुरवितो असे म्हणून तब्बल चौदा लाख चाळीस हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे ज्ञानेश्वर अंकुश चव्हाण याचे विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील संतोष भुजबळ यांचा ऊस तोडणी कामगार घेऊन ऊस कारखान्याला पुरवण्याचा व्यवसाय असून ते ऊस तोडणीसाठी वेगवेगळ्या ठिकाणहून ऊस तोड कामगार आणत असतात त्यांच्या व्यवसायातून त्यांची ज्ञानेश्वर चव्हाण या व्यक्तीसोबत ओळख झाली.
त्यांनतर चव्हाण यांनी ऊसतोड कामगारांना ॲडव्हान्स मध्ये पैसे देण्यासाठी काही पैशांची वेळोवेळी मागणी केली असता संतोष भुजबळ यांनी वेळोवेळी ज्ञानेश्वर चव्हाण यांना तब्बल 14 लाख 40 हजार रुपये रोख तसेच बँकेच्या माध्यमातून दिले. मात्र त्यानंतर देखील कामगार येत नसल्याने चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क झाला. तसेच संतोष भुजबळ हे चव्हाणचे मूळ गावी गेले असता तेथे देखील तो भेटला नाही नंतर फोन देखील उचलले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे भुजबळ यांच्या निदर्शनास आले.
याबाबत संतोष विठोबा भुजबळ (वय ४०) रा. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी ज्ञानेश्वर अंकुश चव्हाण रा. खोरदड ता. धुळे जि. धुळे या इसमावर फसवणूक प्रकरणी गुन्हे दाखल केले तर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष मारकड हे करत आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…