महाराष्ट्र

डॉ. खराट हे लोकाभिमुख अधिकारी; डॉ. रत्नाकर पंडित

कोल्हापूर: डॉ. संभाजी खराट हे केवळ शासकीय अधिकारीच होते असे नाही तर ते खऱ्या अर्थाने लोकाभिमुख अधिकारी होते, असे गौरवोद्गार शिवाजी विद्यापीठाचे वृत्तपत्र विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. रत्नाकर पंडित यांनी काढले.

विभागीय माहिती कार्यालय (कोल्हापूर) येथील उपसंचालक डॉ. खराट हे 31 जानेवारी रोजी नियत वयोमानानुसार निवृत्त झाले त्याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के होते.

डॉ. पंडित पुढे म्हणाले, डॉ. खराट यांनी त्यांचा कार्यकाल पूर्ण करताना केवळ कर्तव्यालाच प्राधान्य दिले. त्यांच्या ठिकाणी कामाची प्रबळ इच्छा शक्ती होती म्हणूनच त्यांनी त्यांच्या कार्यकालात प्रत्येक ठिकाणी कामाच्या रुपाने अमिट ठसा उमटवला.

सोनटक्के म्हणाले, खराट यांनी त्यांच्या दीड वर्षाच्या कालखंडात कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा तसेच पत्रकारांच्या विविध अडचणी सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. तर प्रा. डॉ. शिवाजी जाधव म्हणाले, डॉ. खराट यांनी प्रशासन सांभाळताना त्यांच्यातील लेखक, अभ्यासक सदैव जिवंत ठेवला. भविष्यात त्यांच्या हातून उत्तमोत्तम साहित्य कृती निर्माण व्हावी, अशा शुभेच्छाही त्यांनी याप्रसंगी दिल्या.

सत्काराला उत्तर देताना डॉ. खराट म्हणाले, कोणत्याही पदावर काम करताना अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ते काम प्रामाणिक भावनेतून केल्यास त्या कार्यालयाची स्वतंत्र ओळख निर्माण होण्यास मदत होईल. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी माहिती जनसंपर्क विभागात काम करताना व्यापक संपर्क ठेवावा. त्याचबरोबर विभागात वेळोवेळी होणारे बदल आत्मसात करावेत, त्यामुळे कार्यकुशलता वाढेल. केवळ प्रशासकीय कामकाज न पाहता समाजातील चालू घडामोडींकडेही डोळसपणाने पहावे, असे आवाहन करुन विभागीय माहिती कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी सहायक संचालक फारुख बागवान, वृषाली पाटील, एकनाथ पोवार यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विभागीय माहिती कार्यालय व कोल्हापूर- सांगली येथील जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ठाणे अंतर्गत मेट्रोबाबतचे गैरसमज दूर करा; नागरिकांशी संवाद साधा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महारेलला जनजागृती, चर्चासत्रे आणि तीन आठवड्यांत पर्यायी मार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश ठाणे : ठाणे अंतर्गत…

4 तास ago

म्हाडाचे घर देण्याच्या आमिषाने निवृत्त बँक अधिकाऱ्याची 29 लाखांची फसवणूक; शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा

सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…

7 तास ago

आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांबद्दल काकांचा मोठा दावा

'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…

7 तास ago

एफडीएची राज्यभर धडक मोहीम! 88 कारवाया, 9.50 कोटींचा बनावट औषधसाठा जप्त; 10 आरोपी गजाआड

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…

7 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसची ‘मंडल यात्रा’; सरकारला वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…

7 तास ago

‘इथेनॉल घोटाळ्याप्रकरणी नितीन गडकरींचा राजीनामा घ्या; मोदींनी देशाची माफी मागावी’; हर्षवर्धन सपकाळ

ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…

7 तास ago