महाराष्ट्र

लंडनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला डॉ. नीलम गोऱ्हे यांची भावपूर्ण अभिवादन

पुणे: महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या १५ ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत महाराष्ट्र विधिमंडळाच्या माननीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या इंग्लंड अभ्यास दौऱ्यावर असून, दौऱ्यादरम्यान त्यांनी लंडन येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट देत अभिवादन केले.

लंडनमधील किंग हेन्रीज रोड, कॅम्डन येथे असलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाऊस’ या ऐतिहासिक स्थळी डॉ. गोऱ्हे यांनी बाबासाहेबांच्या शिल्पाला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतींना वंदन केले. १९२१-२२ या कालावधीत बाबासाहेबांनी शिक्षण घेत असताना याच निवासस्थानी वास्तव्य केले होते. त्यांनी London School of Economics (LSE) येथे शिक्षण घेतले आणि प्रतिकूल परिस्थितीतही उच्च शिक्षण पूर्ण केले, याचा उल्लेख करत डॉ. गोऱ्हे यांनी त्यांच्या जिद्दीला सलाम केला.

महाराष्ट्र शासनाने २०१५ मध्ये हे घर खरेदी करून त्याचे स्मारकात रूपांतर केले आहे. येथे बाबासाहेबांच्या जीवनातील दुर्मीळ छायाचित्रे, वैयक्तिक वस्तू आणि त्यांच्या कार्याचा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला आहे.

या प्रसंगी केंद्र सरकारच्या Nehru Centre चे श्री. रवींद्रचंद्रन यांनी डॉ. गोऱ्हे यांचा सत्कार केला. यावेळी लंडन महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष वृषाल खांडके, वैभव खांडगे, स्मारक व्यवस्थापक श्री. फहद, उद्योजिका अनुश्री चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, स्मारकाची देखभाल आणि सुशोभीकरण अधिक प्रभावी करण्यासाठी तसेच येथील कर्मचारी वर्गास मान्यता देण्यासाठी त्या पाठपुरावा करणार आहेत. या स्मारकाकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट, केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले तसेच निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांचे सतत लक्ष असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

या भेटीमुळे बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय वारशाला नव्याने उजाळा मिळाला असून, त्यांच्या कार्याचा संदेश जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

5 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago