महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या ‘या’ नेत्याने उघड केली नाराजी

नाशिक: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. अनेक नेतेमंडळीही भाजप असो वा शिंदे गट यामध्ये प्रवेश करताना दिसत आहे, असे असताना आता शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार हेमंत गोडसे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. ‘मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज नाही. पण पक्षांतर्गत शिस्त नाही, मी याबाबत मांडणी केली आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.

माजी खासदार हेमंत गोडसे यांनी बुधवारी (दि.16) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले, ‘मी पक्षश्रेष्ठींवर नाराज नाही. एकनाथ शिंदे यांनी अतिशय उत्कृष्ट काम केलं आहे. मी त्यांच्यावर नाराज नाही. पण पक्षांतर्गत शिस्त नाही, मी याबाबत मांडणी केली आहे. मी जे सांगितले, त्यावर चर्चा होत नाही. पद वाटप, आणि संघटन, नियुक्त्या आणि योग्य सिस्टम नाही. एकनाथ शिंदे काम करताय पण जिल्ह्यातील मंत्र्यांनी त्या-त्या संघटनेत लक्ष घालायला पाहिजे. तर संघटना मजबूत होईल’.

तसेच आपल्याकडे एकच आमदार येतात. संघटन मजबूत आणि बांधणी झाली तर फरक पडेल. संघटनेला ताकद द्यायला पाहिजे. एकटे एकनाथ शिंदे काम करू शकत नाही. त्यांचा भार कमी केला पाहिजे. गुणवत्तेवर पदाधिकारी नेमले पाहिजे. एखाद्या पक्षात शिस्त असली की गटबाजी होत नाही. चर्चा चव्हाट्यावर जायला नको, असे त्यांनी म्हटले आहे.

भाजपमध्ये जाण्याचा विचार नाही

भाजपमध्ये जाण्याचा मी कोणताही विचार केलेला नाही. भाजपमध्ये संघटन चांगले आहे. तसे आपल्या पक्षात व्हायला पाहिजे, असे मी सांगितले होते. वरिष्ठ नेत्यांना मी सांगितले आहे. सामाजिक काम घेऊन मी श्रीकांत शिंदे यांची भेट घेणार आहे. ज्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना एकनाथ शिंदे न्याय देतील. गोष्ट कुटुंबाच्या बाहेर जायला नको आणि तेच होतं आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रत्येक जिल्ह्यात मंत्र्यांनी लक्ष द्यायला पाहिजे

याशिवाय, प्रत्येक जिल्ह्यात मंत्र्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. काही विषय जिल्हा पातळीचे असतात. लहान विषयांसाठी राज्य पातळीवर जाण्याची गरज नको. माझ्या तिकिटासाठी उशीर झाला. त्याला समन्वय नाहीतर अनेक कारणे आहेत. नेते, उपनेते या सर्वांना सांगितले आहे, असे त्यांनी म्हटले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

5 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago