कर्नाटक: कर्नाटकमधील महादेवपूरा मतदारसंघात तब्बल एक लाख 250 बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली. बोगस मतदारांद्वारे निकाल बदलण्यात आला, असे गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला होता.
बोगस मतदारांच्या नोंदणीबाबत राहुल गांधी प्रचंड आक्रमक झाले असून त्यांनी थेट मतदार याद्यांद्वारे पुरावेच सादर केले. एकाच घरात 80 मतदार राहत असल्याचे त्यांनी समोर आणले.
राहुल गांधींनी थेट निवडणूक आयोग मत चोरी करत असल्याचा आरोप केल्याने मोठी खबळबळ उडाली. निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांनी केलेले आरोप सत्य आहेत असे प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे प्रत्युत्तर दिले. दरम्यान, राहुल यांच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाईट बंद केली तसेच महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेशाच्या मतदार याद्या गायब केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
राहुल गांधी म्हणाले, आम्ही दिलेल्या डेटाबाबत लोक निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर प्रश्न विचारत आहे तर आयोगाने त्यांची वेबसाईट बंद केली. मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान या वेबसाईट बंद केल्या आहेत. त्यांना माहीत आहे की या डेटा संदर्भात प्रश्न विचारले तर त्यांचा संपूर्ण ढाच्या कोसळेल.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरून महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेशाच्या मतदारयाद्या गायब केल्याचा आरोप केलाय. दरम्यान, निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, हरियाण निवडणूक आयोगाची वेबसाईट बंद नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
एकाच बापाची 42 मुल
मतदार याद्यांचा हवाल देत जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, रामकमलदास याला 80 पोरं. म्हणजे त्याच्या बायकोला एका वर्षात तीन पोरं झाली. मी ती यादी ट्विट देखील केली आहे. एकाच बापाची 42 पोरं , वय सगळ्यांचे 29 ते 67 च्या आसपास आहेत. अनेक पोरं एकाच वर्षी जन्माला काढून रामकमलदासने विश्वविक्रम केला आहे. निवडणूक आयोग खूपच पराक्रमी निघाला, असा टोला देखील आव्हाड यांनी लगावला आहे.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…