महाराष्ट्र

प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना वीजबिलात माफी द्यावी; बाळासाहेब थोरात

नागपूर: ग्रामीण भागात नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या बहुतांश प्रादेशिक पाणीपुरवठा योजना थकीत वीजबिल आकारणी अभावी बंद झालेल्या आहेत, या योजनांना शासनाने वीजबिलात माफी किंवा सवलत द्यावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात केली. नागपूर हिवाळी अधिवेशनात बाळासाहेब थोरात यांनी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा मुद्दा लावून धरला.

थोरात म्हणाले, ‘राज्यात बहुतांश भागात दुष्काळाची परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर झाली आहे. अशावेळी थेट पाण्याचा उद्भव नसलेल्या भागात शासनाच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना चांगले काम करतात. मात्र या योजना राबवताना मोठे वीजबिल त्यासाठी आकारले जाते. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हे वीजबिल भरणे लाभार्थ्यांना परवडत नाही. आज महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यांत ग्रामीण भागात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनाची अवस्था वीज देयकच्या बाबतीत अत्यंत कठीण झालेली आहे. त्यांची विज कट केली जात आहे, अशा परिस्थितीत या गावांमध्ये आठ-आठ दिवस पाणीपुरवठाच होत नाही. यामध्ये शासनाने गंभीरपणे विचार करावा व त्याबाबत धोरण निश्चित करून त्या गावच्या पाठिशी उभे राहावे.

थोरात पुढे म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. योजना सुरू झालेल्या आहे. आता विजबिला अभावी योजना ठप्प आहेत, नागरिकांना पाणी मिळत नाही, शासनाला जबाबदारी घ्यावी लागेल. या अगोदरही शासनाने निर्णय घेतलेला आहे. आता उशीर करू नये. धोरण ठरवावे आणि सामान्य माणसाला दिलासा द्यावा.‘

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

13 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago