महाराष्ट्र

हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात

बीड: बीडमधून मोठी बातमी समोर येत आहे, बीडमध्ये मनोज जरांगे पाटील असलेल्या लिफ्टचा अपघात झाला आहे. लिफ्ट पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली. सुदैवानं या अपघातामध्ये कोणालाही मोठी दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर लिफ्टचा दरवाजा तोडून मनोज जरांगे पाटील यांच्यासह सहकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. बीडमधील एका हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे एका रुग्णाला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आले होते. बीडमधलं एक मोठं शिवाजीराव क्रिटिकल केअर नावाचां हॉस्पिटल आहे. या रुग्णालयात ही घटना घडली आहे. या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एका रुग्णाला भेटण्यासाठी मनोज जरांगे पाटील जात होते. मात्र मनोज जरांगे पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह लिफ्टने पहिल्या मजल्यावर जाताच लिफ्ट अचानक बंद झाली, आणि ती पहिल्या मजल्यावरून थेट ग्राऊंड फ्लोअरला येऊन आदळली. जेव्हा हा अपघात झाला तेव्हा त्या लिफ्टमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यासह त्यांचे काही सहकारी देखील होते, त्या सर्वांना लिफ्टचा दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आलं.

रुग्णालयात गोंधळ

मनोज जरांगे पाटील हे रुग्णाला भेटायला जात असताना पहिल्या मजल्यावर ही लिफ्ट अचानक बंद पडली, त्यानंतर ती पहिल्या मजल्यावरून थेट जमिनीवर आदळली. या घटनेमुळे रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. या लिफ्टमध्ये अडकलेले मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लिफ्टचा दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आलं. सुदैवानं या अपघातामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. पुन्हा एकदा मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईमध्ये धडकणार आहे. या आंदोलनाची तयारी सध्या सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून बैठकांचा धडाका सुरू आहे. मागील आंदोलनापेक्षा हे आंदोलन पाच पटीनं मोठं असेल असंही त्यांनी म्हटलं आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

7 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

7 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

7 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

8 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

8 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

8 तास ago