गणेशोत्सवात समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे सहकार्य
मुंबई: समाजातील गरजू व आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य पुरविण्यासाठी सुरू असलेल्या ‘एक वही, एक पेन’ या उपक्रमास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोलाचा हातभार लावला आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने हारफुलांसह शैक्षणिक साहित्य श्री गणेशचरणी अर्पण करून वंचित विद्यार्थ्यांना मदत करण्याचा संदेश या अभियानातून दिला जातो. या उपक्रमाच्या शिष्टमंडळाने, प्रणेते पत्रकार राजू झनके यांच्या नेतृत्वाखाली, डॉ. गोऱ्हे यांच्या शासकीय निवासस्थानी भेट दिली. मागील दहा वर्षांत हजारो विद्यार्थ्यांना मदत पोहोचविणाऱ्या या अभियानाचे डॉ. गोऱ्हे यांनी कौतुक करत शिक्षणापासून कोणताही घटक वंचित राहू नये, यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी स्वतः शैक्षणिक साहित्य देऊन सहभाग नोंदवला तसेच समाजालाही आवाहन केले की, “गणेशोत्सवात हारफुलांसह शैक्षणिक साहित्य अर्पण करून वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावा.” या भेटीत शिष्टमंडळात अविनाश गरुड, राजेश उबाळे, राजू लोखंडे, सुनील वाकोडे, पत्रकार काशिनाथ म्हादे, सुरेश ठमके आदी मान्यवर उपस्थित होते.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…