महाराष्ट्र

ईडी सरकार आल्यापासून केवळ घोषणांचा पाऊस, अंमलबजावणी मात्र शून्य; नाना पटोले

मुंबई: महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे पण अजूपर्यंत सर्वे झालेले नाहीत. शेतकरी व जनतेसमोर एकीकडे आस्मानी संकट आहे तर दुसरीकडे सुलतानी संकट आहे. शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या मागे नैसर्गिक संकट लागले आहे. सरकार केवळ घोषणा मागून घोषणा करत आहे. ईडी सरकार आल्यापासून केवळ घोषणांचा पाऊस पडत आहे तर अंमलबजावणी मात्र शून्य आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

विधानभवन परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, सरकार वर्षभरापासून केवळ पोकळ घोषणा करत आहे. जनतेच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. या सरकारवर शेतकरी व जनतेचा भरोसा राहिलेला नाही. राज्यात सरकार आहे की नाही असे चित्र आहे. प्रशासनात अनागोंदी चालली असून जनतेला लुटले जात आहे.

मुंबईसह राज्यात सगळीकडील रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत, सर्व रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य आहे, या खड्डयांमुळे ट्रॅफिक जॅम होत असून लोकांचे नाहक बळी जात आहेत. खड्डेमुक्त रस्ते करण्याची घोषणा सरकारने केली होती, त्याचे काय झाले? असा संतप्त सवाल उपस्थित केला. राज्याची समृद्धी करायले निघालेल्या सरकारने समृद्धी महामार्ग मृत्युंचा सापळा बनवला आहे. विधानसभेत सरकारला प्रश्न विचारले तर मंत्री स्पष्ट उत्तरे देत नाहीत, तपासू, बघू, पाहू अशी उत्तरे दिली जातात.

राष्ट्रीय महामार्गावरील टोलसंदर्भात गाईडलाईन्स आहेत. रस्त्यावर खड्डे असतील तर टोल घेतला जात नाही पण नॅशनल हायवेवर खड्डे पडलेले असतानाही टोल वसुली केली जात आहे. टोलमाफियांचे राज्य असून सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही. टोलमाफिया सरकारचे जावई आहेत का? असा सवाल नाना पटोले यांनी विचारला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मतदार वगळण्यावरून काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…

13 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त; सरकार मात्र कागदी घोडे नाचवतंय; हर्षवर्धन सपकाळ

‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…

14 तास ago

घोड पाटबंधारे विभागाची भुमिका संशयास्पद…? पोलिसांना दिलेल्या पत्रात फक्त ठराविक वाळु माफियांची नावं

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…

21 तास ago

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

2 दिवस ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

2 दिवस ago