महाराष्ट्र

ईव्हीएम सापडल्याने खळबळ! बार-हॉटेलच्या आवारात मशिन कशी? प्रशासनाकडे स्पष्टीकरण

मोहोळ: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी शनिवारी संपूर्ण राज्यात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असली, तरी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात घडलेल्या एका खळबळजनक घटनेमुळे निवडणूक प्रशासनाची झोप उडाली आहे.

मोहोळ शहराजवळील एका खाजगी बार व हॉटेलच्या परिसरात चक्क ईव्हीएम मशिन आढळून आल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर मशिन जमा करण्याची घाई सुरू असतानाच हा धक्कादायक प्रकार समोर आला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील यांना मोहोळजवळील ‘स्वराज्य बार अँड हॉटेल’ परिसरात काही संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी बारच्या आवारात काही व्यक्तींकडे ईव्हीएम मशिन असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

एका बाजूला मतदानानंतर ईव्हीएम मशिनची सुरक्षा कडेकोट असणे अपेक्षित असताना, दुसऱ्या बाजूला त्या मशिन चक्क खाजगी हॉटेलच्या परिसरात आढळल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. उमेश पाटील यांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद करत निवडणूक यंत्रणेला जाब विचारला.

प्रकरणाची माहिती मिळताच निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर आणि तहसीलदार सचिन मुळीक यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाकडून संबंधित मशिन या ‘राखीव’ (Reserve) असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

मात्र निवडणूक नियमांनुसार राखीव ईव्हीएम मशिनची वाहतूक करतानाही कडक पोलीस बंदोबस्त आणि अधिकृत वाहनाचा वापर बंधनकारक आहे. असे असताना या मशिन खाजगी बार-हॉटेलच्या आवारात नेमक्या कशा पोहोचल्या, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.या प्रकरणामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, संपूर्ण घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवसेनेचा आत्मा मराठमोळ्या, रांगड्या आणि सेवाभावी शिवसैनिकातच!

मुंबई: शिवसेना ही केवळ एक राजकीय संघटना नाही, तर लाखो शिवसैनिकांच्या त्याग, निष्ठा आणि जनसेवेच्या…

46 मिनिटे ago

CJP ची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; अभिजीत दीपके राष्ट्रीय संयोजक, सौरव दास-आशुतोष रांका सहसंयोजक

मुंबई : CJP (कॉकरोच जनता पार्टी) ने आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. पक्षाचे संस्थापक…

3 तास ago

आधी तरुणांची माफी मागा, मग संवाद साधा; मोहन भागवतांवर काँग्रेसचा निशाणा

मुंबई: पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांच्या मागणीसाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय…

17 तास ago

ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विराट जनआक्रोश मोर्चा; भाजप सरकारवर घणाघाती हल्लाबोल

महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि स्मार्ट मीटरवरून सरकारवर टीका; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन…

17 तास ago

व्यायाम व योगा करण्याचे फायदे

1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे…

21 तास ago

चयापचय बिघडण्याची कारणे

झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोन्सचे…

21 तास ago