महाराष्ट्र

उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाणार? महायुतीच्या संख्याबळामुळे मविआपुढे मोठे आव्हान

मुंबई:  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषदेच्या नऊ आमदारांचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. त्यामुळे ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जातील का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

मे २०२० मध्ये विधानसभेच्या सदस्यांमधून हे नऊ आमदार बिनविरोध विधान परिषदेवर निवडून गेले होते. त्यावेळी महाविकास आघाडीला पाच, तर भाजपला चार जागा मिळाल्या होत्या. मात्र सध्याची राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली असून, येणाऱ्या निवडणुकीत भाजप-महायुतीला स्पष्ट फायदा होईल, असे संख्याबळ सांगते.

महायुतीकडे २३५ आमदारांचे बळ

सध्याच्या घडीला महायुतीकडे तब्बल २३५ विधानसभा सदस्य आहेत. याउलट महाविकास आघाडीला माकप व शेकापसह एकूण ४८ आमदारांचेच संख्याबळ आहे. अन्य दोन पक्षांचे तीन आमदार असून, दोन जागा रिक्त आहेत.

मे महिन्यात विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक झाल्यास, विधानसभेचे सर्व २८८ आमदार मतदान करतील.

आधी राज्यसभा निवडणूक

विधान परिषदेपूर्वी सात जागांसाठी राज्यसभा निवडणूक होणार आहे. उपलब्ध संख्याबळानुसार मविआला एकच जागा मिळण्याची शक्यता आहे. ही जागा मविआतील कोणत्या पक्षाला दिली जाते, यावर विधान परिषदेतील उमेदवारीचे गणित ठरणार आहे.एका पक्षाला राज्यसभा आणि दुसऱ्याला विधान परिषद, अशी तडजोड मविआला करावी लागणार असल्याचे संकेत आहेत.

भाजपकडून नवे चेहरे?

भाजपच्या चारपैकी गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके आणि रमेश कराड हे सध्या विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून नवे चेहरे संधी मिळण्याची शक्यता आहे.

सोलापूरच्या राजकारणातील अलीकडच्या घडामोडींनंतर भाजप रणजितसिंह मोहिते पाटील यांच्याबाबत काय भूमिका घेते, याकडे विशेष लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार?

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात त्यांनी राजीनामा दिला नव्हता.

यावेळी ते स्वतः विधान परिषदेवर जाण्यास इच्छुक असतील का, आणि त्यासाठी मविआतील घटक पक्ष एकमताने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतील का, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

उद्धवसेनेने राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेस किंवा शरद पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यास, त्याचा अर्थ उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार, असा काढला जात आहे.

२०२० मध्ये निवडून आलेले नऊ आमदार

उद्धव ठाकरे (उद्धवसेना)

डॉ. नीलम गोन्हे (तेव्हा उद्धवसेना, सध्या शिंदेसेना)

शशिकांत शिंदे (शरद पवार गट)

अमोल मिटकरी (अजित पवार गट)

राजेश राठोड (काँग्रेस)

गोपीचंद पडळकर (भाजप)

प्रवीण दटके (भाजप)

रणजितसिंह मोहिते पाटील (भाजप)

रमेश कराड (भाजप)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कमी खाऊनही वाढतंय तुमचं वजन, या 5 सवयी ठरु शकतील जबाबदार

सध्या सर्वांना भेडसवणार एकच प्रश्न म्हणजे वजन कमीच होत नाही. अनेक जण वजन कमी करण्यासाठी…

2 तास ago

रात्रीच्या जेवणानंतर इवलिशी वेलची चावून खा! एक नाही अनेक गुणकारी फायदे

रात्रीच्या जेवणानंतर आपल्यापैकी बऱ्याचजणांना गोड पदार्थ खाण्याचे क्रेविंग्स होतात. अशावेळी या गोड पदार्थांचे क्रेविंग्स भागवण्यासाठी…

2 तास ago

SIR वादावर NDAमध्येही मतभेद? कुशवाहांचा निवडणूक आयोगाला सवाल

नवी दिल्ली : विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याभोवती सुरू…

2 तास ago

कडा हादरले! गणेश विसर्जन मिरवणुकीत १८ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला

जुन्या वादातून हल्ल्याचा संशय; छाती, पोट आणि हातावर सपासप वार, प्रकृती गंभीर; हल्लेखोरांचा शोध सुरू…

2 तास ago

मीटरवरील ‘हा’ लाल दिवा देतोय मोठा संकेत! वीजबिल वाढण्याआधीच कळू शकते कारण

मुंबई : घरातील इलेक्ट्रिक मीटर म्हणजे केवळ किती युनिट वीज वापरली याची नोंद करणारे उपकरण…

3 तास ago

विखे कुटुंबातील नीला विखे पाटील स्वीडनच्या संसदेत

काका राधाकृष्ण विखे पाटलांपासून दशकभर संपर्क नसल्याचा दावा अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या विखे पाटील कुटुंबातील नीला…

3 तास ago