महाराष्ट्र

शेतकरी बांधवांनो, आत्महत्या करू नका; शेतकरी मेल्याचे सरकारला सोयर सुतक नाही

शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर सही करण्यास देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवारांच्या हाताला लकवा मारला आहे का

मुंबई: राज्यात दररोज ६ शेतकरी आत्महत्या करत आहेत परंतु भाजपा युती सरकारला त्याचे काहीच सोयर सुतक नाही. राज्यातले सरकार फक्त गेंड्याच्या कातडीसारखे निगरगट्टच नाही तर नाही तर आंधळे, मुके व बहिरे आहे. या सरकारला भ्रष्टाचारापुढे शेतकऱ्यांचे दुःख दिसत नाही. भाजपा युतीचे सरकार हे शेतकरीविरोधी आहे. अदानी, अंबानीच्या फाईलवर सह्या करणाऱ्या देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या हाताला शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर सही करण्यास लकवा मारतो काय? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजपा युती सरकारचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील शेतकरी बाबासाहेब सुभाष सरोदे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मोबाईलमध्ये बनवलेल्या व्हिडिओत सरोदे म्हणतात, “कर्जमाफी होऊन कर्जमुक्त होईल या आशेवर मी जगत होतो, या सरकारमध्ये गोरगरिब शेतकऱ्यांसाठी काहीच नाही म्हणून माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली”. हे ऐकून मन सुन्न झाले पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, व अजित पवार यांना याचे काहीच वाटत नाही. आजही ‘योग्यवेळी शेतकरी कर्जमाफी करु’, असे निर्लज्जपणे सांगितले जाते पण ही योग्यवेळ किती शेतक-यांचा बळी घेतल्यावर येणार आहे.

बाबासाहेब सरोदे यांच्या सारखे शेतकरी दररोज जीवन संपवत आहेत, मायबाप सरकारच्या मदतीच्या आशेवर जगणारा गोरगरिब शेतकरी सरकारने केलेल्या फसवणुकीमुळे निराश आणि हताश झाला आहे. शेतीसाठी लागणारे बी, बियाणे, खते, डिझेल भाजपा सरकारने महाग केले, शेतमालाला भाव नाही, निसर्गही साथ देत नाही. वर्षाला ६ हजार रुपये तोंडावर मारून शेतकऱ्यांसाठी खूप काही केले अशा गप्पा मारणारे हे भाजपा युतीचे सरकार फक्त मलई खाण्यात मग्न आहे. “शेतकऱ्यांनो, या निर्ढावलेल्या सरकारच्या भरवश्यावर राहू नका, आत्महत्या करू नका, तुमच्या मुलाबाळांचा, कुटुंबियांचा विचार करा”, असे कळकळीचे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

6 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

20 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago