अंबाजोगाई: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे शनिवारी मध्यरात्री किरकोळ वादातून २१ वर्षीय तरुणाची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेत आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली.
मृत तरुणाचे नाव ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे (वय २१, रा. पट्टीवडगाव) असे आहे. तो गेल्या वर्षभरापासून लातूरजवळील हायवेवरील एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करत होता.
माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ज्ञानेश्वर आपल्या दोन मित्रांसह दुचाकीवरून अंबाजोगाईहून घाटनांदूरकडे जात होता. घाटनांदूर येथील साठे चौकात काही जणांसोबत त्यांचा किरकोळ वाद झाला. या वादाचे पर्यवसान हिंसक हल्ल्यात झाले. संशयितांनी धारदार चाकूने ज्ञानेश्वरवर सपासप वार केल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
हल्ल्यावेळी ज्ञानेश्वरसोबत असलेल्या मित्रांपैकी एकाने प्रसंगावधान राखत घटनास्थळावरून पळ काढल्याने त्याचा जीव वाचला, तर दुसरा मित्र गंभीर जखमी झाला. जखमीवर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृतदेह शवविच्छेदनासाठी त्याच रुग्णालयात पाठवण्यात आला असून अंबाजोगाई ग्रामीण पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिस निरीक्षक मुरलीधर खोकले यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही. आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…
आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…
आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…
नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…