महाराष्ट्र

मिश्रा कुटुंबीयांवर नियतीचा घाला, लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे दोन बळी

मुंबई: घाटकोपरच्या पार्कसाईट विभागात आज पहाटे झालेल्या दरड दुर्घटनेत मिश्रा कुटुंबातील शालू मिश्रा व सुरेश मिश्रा यांचा जागीच मृत्यू झाला असून, आरती मिश्रा आणि ऋतुराज मिश्रा गंभीर जखमी आहेत. ही घटना केवळ नैसर्गिक आपत्ती नाही, तर स्थानिक लोकप्रतिनिधी, महानगरपालिका आणि MHADA प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे थेट परिणाम आहे.

घटना आणि पार्श्वभूमी पार्कसाईट हा डोंगराळ व धोकादायक भूभाग असून, इथे राहणाऱ्या शेकडो कुटुंबांवर दरड कोसळण्याचा धोका वर्षानुवर्षे आहे.मे २०२५ मध्येच महानगरपालिकेने संबंधित रहिवाशांना नोटीस पाठवून घर खाली करण्याचे आदेश दिले होते. त्या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पालिकेला भेट देऊन, फक्त नोटीस देऊन थांबू नये, तर रहिवाशांना पर्यायी पुनर्वसन व्यवस्था करावी अशी ठोस मागणी केली होती.

प्रशासनाकडून उत्तर मिळाले होते की MHADA संरक्षणभिंत उभारणार आहे, पण आजपर्यंत त्या कामाचा मागमूसही नाही. लोकप्रतिनिधींची उदासीनता घाटकोपर पश्चिमच्या लोकप्रतिनिधींनी येथील झोपडपट्टी भागात अनधिकृत शौचालये उभी करून राजकारण केले, पण सुरक्षिततेसाठी कोणतीही पावले उचलली नाहीत. त्यांना ठाऊक होते की हा भाग दरड कोसळण्याच्या धोक्यात आहे, तरीही प्राथमिकतेने संरक्षणभिंत उभारण्याची मागणी किंवा काम सुरू केले नाही.आजच्या घटनेनंतरही हे लोकप्रतिनिधी दहीहंडी उत्सवात रमले आहेत, पण मृतांच्या कुटुंबियांना साधी भेटदेखील दिलेली नाही.

गंभीर आरोप महानगरपालिकेवर आरोप केवळ नोटीस देऊन जबाबदारी टाळली, पर्यायी पुनर्वसनाची कोणतीही कार्यवाही केली नाही.MHADAवर आरोप संरक्षणभिंत उभारण्याचे आश्वासन दिले, पण कोणतीही प्रत्यक्ष कामगिरी केली नाही. स्थानिक लोकप्रतिनिधींवर आरोप धोका माहिती असूनही निव्वळ राजकीय फायद्यासाठी कामे, सुरक्षिततेकडे पूर्ण दुर्लक्ष.

आमची ठाम मागणी मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ किमान ₹२५ लाखांची आर्थिक मदत व कायमस्वरूपी पुनर्वसनाची हमी द्यावी.जखमींना मोफत आणि सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत.पार्कसाईटसह सर्व डोंगराळ धोकादायक भागातील संरक्षक भिंतींची तातडीने उभारणी करावी. निष्काळजीपणासाठी जबाबदार लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा “लोकप्रतिनिधी जर निष्क्रिय, प्रशासन जर बहिरे आणि MHADA जर आंधळे असेल, तर सामान्य नागरिकांनी न्याय मागायचा कोणाकडे

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

2 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

11 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

11 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

11 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

11 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

12 तास ago