मुख्य बातम्या

‘सायकलचा आधार भविष्याला आकार’  उपक्रमातून ग्रामीण भागातील शैक्षणिक प्रवास होणार सुलभ

शिरूर तालुक्यात तब्बल ३३१ सायकलीचे वाटप 

शिरूर (अरुणकुमार मोटे): ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शैक्षणिक प्रवासाला चालना देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने “सायकलचा आधार, भविष्याला आकार” हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमाला शिरूर तालुक्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून एकूण ३३१ सायकली गरजू मुलींना भेट म्हणून देण्यात आल्या.

शिरूर तालुक्यातील अनेक विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी दररोज लांबचा प्रवास करावा लागतो. सार्वजनिक वाहतूक साधने अपुरी असल्याने त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही समस्या दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेने गावागावांतील दानशूर व्यक्तींना सायकल दान करण्याचे आवाहन केले होते.

या आवाहनाला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, सर्व शिक्षक संघटना, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी तसेच समाजातील दानशूर व्यक्तींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सामूहिक सहभागातून तब्बल ३३१ सायकली जमा होऊन विद्यार्थिनींना वाटप करण्यात आल्या.

शिरूर तालुक्यातील गोलेगाव – १०,करंजावणे – ३, पिंपळे खालसा – १०, सोनेसांगवी – २, शिरूर ग्रामीण – २

न्हावरा – १,बाभुळकर बु. – ६,कर्डे – ३

वरुडे – १,जातेगाव बु. – २,आन्नापूर – १८

शिरसगाव काटा – ४,निमोणे – २४,काठापूर खुर्द – ५,धानोरे – १,रांजणगाव सांडस – ७,रांजणगाव गणपती – २,दहिवडी – १,तर्डोबाची वाडी – ६

सरदवाडी – २,खैरेवाडी – ६,केंदूर – ३,पारोडी – १५,सविंदणे – ४,कोंढापुरी – ४,तळेगाव – १८

मलठण – १६,कवठे येमाई – २,पाबळ – १

निमगाव म्हाळुंगी – २ अशा प्रकारे गावनिहाय सायकली वाटप करण्यात आल्या.

या उपक्रमाबाबत गटविकास अधिकारी महेश डोके यांनी सांगितले की, “अनेक विद्यार्थिनी लांबवरून पायी शाळेत जातात. सायकल मिळाल्याने त्यांचा शैक्षणिक प्रवास सुलभ होईल. एका सायकलीमुळे एका मुलीचे जीवनमान बदलू शकते. जिल्हा परिषद व समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन हा उपक्रम यशस्वी केला आहे. या उपक्रमामुळे मुलींच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. शाळेत ये-जा करण्यासाठी मिळालेल्या या सायकलींमुळे केवळ वेळ वाचणार नाही, तर शैक्षणिक प्रगतीलाही चालना मिळणार आहे. दानशूर व्यक्तींनी केलेल्या योगदानामुळे समाजातील संवेदनशीलता आणि शैक्षणिक बांधिलकी अधोरेखित झाली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

14 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

14 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

14 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

14 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

14 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

18 तास ago