महाराष्ट्र

संजय राऊत यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा; अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोल

मुंबई: शिवसेना महिला सेनेने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंदवून अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच कारवाई न झाल्यास “शिवसेना स्टाईल” तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही महिला सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

यासंदर्भात गुरुवारी महिला सेनेच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना नेत्या मीना कांबळी, उपनेत्या शीतल म्हात्रे, राष्ट्रीय सचिव शायना एन. सी., उपनेत्या व बेस्ट अध्यक्षा तृष्णा विश्वासराव, उपनेत्या सुवर्णा करंजे, कला शिंदे, दीक्षा कारकर, संध्या दोषी यांच्यासह महिला सेनेच्या अनेक पदाधिकारी उपस्थित होत्या.

उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी पत्रकारांशी बोलताना आरोप केला की, खासदार संजय राऊत यांनी सार्वजनिक भाषणांमधून आणि इतर माध्यमांतून सातत्याने आक्षेपार्ह भाषा वापरून लोकप्रतिनिधी तसेच महिलांचा अवमान केला आहे. तसेच एका महिलेला फोनवरून शिवीगाळ व धमकी दिल्याचा कथित ऑडिओ समोर आल्याचा दावाही त्यांनी केला.

महिला सेनेने भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांअंतर्गत राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. तसेच राऊत यांनी समाजमाध्यमांवर बंदुकीसह पोस्ट केलेल्या छायाचित्राचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन. सी. यांनीही राऊत यांच्या वक्तव्यांवर टीका करत, महिलांचा अवमान सहन केला जाणार नाही आणि भविष्यात अशा प्रकारची वक्तव्ये झाल्यास महिला सेना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

7 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

8 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

9 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

9 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

9 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

9 तास ago