महाराष्ट्र

अजित पवारांच्या निधनानंतर रोहित पवारांचे महाराष्ट्रला भावनिक आवाहन; म्हणाले…

पुणे: बारामतीजवळ झालेल्या भीषण विमान अपघाताने महाराष्ट्राच्या राजकारणाला जबर धक्का दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे प्रचारासाठी निघाले होते. सकाळी 8.15 वाजता मुंबई विमानतळावरून उड्डाण झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात, सकाळी 8.45 च्या सुमारास बारामतीच्या धावपट्टीजवळ विमान कोसळले.  या दुर्घटनेत अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. राज्यासाठी हा केवळ अपघात नव्हता, तर प्रभावी नेतृत्व अचानक हरपल्याचा क्षण होता.

अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आता याच ठिकाणी त्यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय पुढे येत आहे. हे स्मारक केवळ एका नेत्याचे स्मरणस्थळ नसेल, तर चार दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची साक्ष देणारे ठिकाण ठरणार आहे.

या दुःखाच्या काळात पवार कुटुंब एकत्र आलेले दिसत आहे. रोहित पवार, युगेंद्र पवार आणि जय पवार यांनी सोशल मीडियावरून अजित पवारांच्या आठवणी व्यक्त केल्या आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत विद्या प्रतिष्ठानमध्ये कुटुंबाची बैठकही झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी सांगितले की, प्रचारासाठी घाईघाईत निघालेल्या अजित पवारांसोबत ही दुर्दैवी घटना घडली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा तो शेवटचा दिवस होता.

रोहित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडत म्हटले की, अजित पवारांना राजकीय श्रद्धांजली द्यायची असेल, तर त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मतदारांनी पाठिंबा द्यावा. दुःखामुळे पवार कुटुंबाला प्रचारात सहभागी होता आले नाही, याची जाणीव मतदार ठेवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले की, पवार कुटुंबात शरद पवार नेहमीच केंद्रबिंदू राहिले आहेत. कठीण प्रसंगी त्यांनी कुटुंबाला आधार दिला असून, अजित पवार नसतानाही त्यांचे मार्गदर्शन सुरू आहे. पार्थ पवार, सुनेत्रा पवार, जय पवार आणि संपूर्ण कुटुंबाची एकच इच्छा आहे की, अजित पवारांचे भव्य आणि लोकांना सहज भेट देता येईल असे स्मारक उभे राहावे. कारण अजित पवारांचे राजकारणातील योगदान 35 ते 40 वर्षांचे होते आणि ते स्मरणात राहणे हीच खरी आदरांजली ठरेल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगाव गणपती येथे ३ ऑक्टोबर रोजी भव्य महास्वच्छता अभियान; ५ हजार विद्यार्थी…

रांजणगाव गणपती : राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त निर्मलग्राम…

43 मिनिटे ago

शिरूरचा शेतकरी दुष्काळात होरपळतोय; लोकप्रतिनिधी वाढदिवसाच्या जल्लोषात; फ्लेक्स, बॅनर अन् वाढदिवसाच्या उधळपट्टीवर शेतकऱ्यांचा संताप…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला…

23 तास ago

शिरूर गोळ्यांच्या आवाजाने हादरतोय; पाच घटनांमध्ये तिघांचा मृत्यू, एकाचा गंभीर मारहाणीत बळी…

शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यातील दोन हवालदारांवर एसीबीची कारवाई; एकाने घेतली लाच तर दुसरा झाला पसार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

2 दिवस ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

2 दिवस ago