जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला मोठे बळ; माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे शिवसेनेत प्रवेशाच्या तयारीत

मुंबई: जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढण्याची शक्यता असून माजी आमदार व शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे हे अख्ख्या पक्षासह शिवसेनेत विलीन होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आगामी नांदेड जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शंकरअण्णा धोंडगे यांनी नुकतीच मुंबईत उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. धोंडगे यांचा महाराष्ट्र राज्य समिती (एमआरएस) हा पक्षदेखील शिवसेनेत विलीन होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, एमआरएस पक्षाचे राज्यातील तब्बल २२ जिल्हाध्यक्ष शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाची संघटनात्मक ताकद वाढणार असल्याचे चित्र आहे. बीआरएसने विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून माघार घेतल्यानंतर शंकरअण्णा धोंडगे यांनी बीआरएसच्या धर्तीवर एमआरएस पक्षाची स्थापना केली होती.

शेतकरी चळवळीतून राजकारणाची सुरुवात केलेले शंकरअण्णा धोंडगे हे लोहा–कंधार विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ही निवडणूक जिंकली होती. शेतकरी नेते म्हणून त्यांची राज्यभर ओळख आहे. त्यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशामुळे लोहा–कंधार विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी शिवसेनेची ताकद वाढण्याचे संकेत मिळत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

59 मिनिटे ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

20 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago