महाराष्ट्र

महापालिका निकालानंतर मनोज जरांगे पाटील यांचा अजित पवारांवर हल्लाबोल; फडणवीसांनाही इशारा

मुंबई: महापालिका निवडणुकीच्या निकालात राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून शिवसेना शिंदे गटालाही चांगले यश मिळाले आहे. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला तसेच शरद पवार गटालाही मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “यांनी बघायला काही ठेवलंच नाही. हे लई कलाकार आहेत. आधी महाविकास आघाडी संपवली आणि आता शिंदे व अजितदादांचा काटा काढला. अजितदादा पापी आणि रक्ताने माखलेली लोकं सोबत ठेवतात, त्यामुळे लोक त्यांच्यापासून दूर गेले.”

ते पुढे म्हणाले की, “मराठ्यांचं मतदान अजित पवारांना झालंच नाही. नाहीतर पुण्यात त्यांना इतकं कमी यश मिळालं नसतं. दोन नासके लोक सांभाळल्यामुळे मराठा समाज त्यांच्यापासून दूर गेला. यातून अजित पवारांनी काहीतरी शिकावं.”जरांगे पाटील यांनी भाजपवरही अप्रत्यक्ष टीका करत सवाल उपस्थित केला की, “अजित पवारांना भाजप जवळ का करत नाही, याचाही त्यांनी विचार केला पाहिजे.”

दरम्यान, सामाजिक समीकरणांवर भाष्य करताना ते म्हणाले, “मुस्लिम, दलित आणि मराठा एक झाले की सगळ्यांचा धुरळा उडतो. म्हणून मी वारंवार या समाजांना सांगतो की एकदा यांना पायाखाली चेंगरा. २०२९ च्या निवडणुकीत हे चित्र पाहायला मिळेल.”

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी थेट इशारा दिला. “मराठवाड्यात हैदराबाद गॅझेटचा जीआर निघाला, अमलबजावणी झाली; पण प्रमाणपत्र वाटप सुरू नाही. मुख्यमंत्री किती दिवस मराठ्यांना वेड्यात काढतात ते पाहू. फक्त जीआर काढून मराठ्यांची फसवणूक केली तर मराठा समाज तुम्हाला सत्तेतून खाली खेचू शकतो,” असा इशाराही त्यांनी दिला.महापालिका निवडणुकीतील यशामुळे हवेत जाऊ नये, असा स्पष्ट संदेश मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

औषधनिर्मिती क्षेत्रातील संशोधनाला महाराष्ट्राचे बळ! जागतिक कंपन्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…

5 तास ago

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

1 दिवस ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

2 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago