मुंबई: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन महत्त्वाच्या महानगरपालिकांवरही भाजपने विजय मिळवत भगवा फडकवला आहे.
या विजयाचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जनतेला दिले असून, या निकालाला त्यांनी “लँडस्लाइड व्हिक्टरी” असे संबोधले. ते पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते.
“पुण्याचे दादा म्हणजे पुण्याची जनता”
यावेळी पत्रकारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना, “आता पुण्याचे दादा कोण?” असा प्रश्न विचारला. यावर त्यांनी अतिशय समर्पक आणि जनतेचे मन जिंकणारे उत्तर दिले.
“पुण्याचे ‘दादा’ पुण्याची जनता आहे. आम्ही सगळे तिचे सेवक आहोत,”असे एका वाक्यात त्यांनी स्पष्ट केले.
“गिरा तो क्या हुआ, टांग तो उपर थी…”
मुंबईतील निकालानंतर खासदार संजय राऊत यांनी पैशाचा वापर झाल्याचा आरोप करत महायुतीला काठावरचे बहुमत मिळाल्याची टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,
“आम्हाला एकशे एकोणीस जागा मिळाल्या आहेत. शिवाय, आमच्या जवळपास १४ जागा अतिशय कमी मतांनी कुठे सात, कुठे पाच, तर कुठे शंभर मतांनी गेल्या आहेत.
पण तरीही पूर्ण बहुमत आमच्याकडे आहे. गेल्या तीन निवडणुकांत एकत्रित शिवसेनेलाही एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या. तो विक्रम आम्ही मोडला आहे.” यावेळी त्यांनी मिश्किल शैलीत म्हणत टीकाकारांना टोला लगावला,
“गिरा तो क्या हुआ, टांग तो उपर थी… अशा म्हणणाऱ्यांवर फार काही बोलायचं नसतं.”
महायुतीचाच महापौर होणार; फडणवीस
उद्धव ठाकरे यांनी, “देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होईल,” असे विधान केले होते. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले,
“देवाच्या म्हणजे माझ्या की वरच्या देवाच्या?
वरच्या देवानेच ठरवलं आहे की महायुतीचाच महापौर होणार. त्यामुळे आमचाच महापौर असेल,”असे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले.
खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…
ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…