महाराष्ट्र

संसदेच्या इतिहासात प्रथमच सेवानिवृत्त शिक्षकांना खासदार लंके यांनी घडविले संसद दर्शन

शिक्षकांनी घेतला थेट अधिवेशनाचा अनुभव

पारनेर: शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार असतो. आपल्या कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या मनावर सातत्याने संस्कार करणा-या शिक्षकांचा गौरव करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. हेच भान ठेवत खासदार नीलेश लंके यांनी एक विलक्षण आणि अभूतपूर्व उपक्रम राबवत दोऩशे हून २०० सेवानिवृत्त शिक्षकांसाठी संसदेच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते.

 

त्यावेळी शिक्षकांना ख-या अर्ताने कृतकृत झाल्याचे जानवले.

अहिल्यानगर रेल्वे स्थानकावरून 19 जुलैला या शिक्षकांचा खासदार नीलेश लंके यांच्या सामावेत प्रवास सुरू झाला. या वेळी अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व या ऐतिहासिक दौऱ्याला सुरूवात झाली.

दिल्लीमध्ये पोहचल्यावर या शिक्षकांनी अक्षरधाम मंदिराला भेट दिली. मंदिरातील भव्य स्थापत्यशैली, संस्कृतीचे दर्शन तसेच संध्याकाळच्या प्रकाश आणि ध्वनी शोमुळे संपूर्ण मंडळी भारावून गेली.

दुसऱ्या दिवशी सर्वांनी लाल किल्ल्याच्या परिसरात दौरा केला. या वेळी त्यांनी मुघलकालीन वास्तुकला, स्वातंत्र्य संग्रमाची पार्श्वभूमी आणि भारताच्या गौरवशाली इतिहासाची झलक अनुभवली.या शिखांचे या दौऱ्यातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे भारतीय संसद भवनाला दिलेली भेट. विशेष म्हणजे या दौऱ्याचा दिवस संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवस होता. शिक्षकांनी संसदेतील प्रत्यक्ष कामकाज अनुभवले.

राज्यसभेच्या सभागृहातील चर्चा, लोकसभेतील प्रश्नोत्तरांची सत्रे मंत्री आणि खासदारांची भाषणे या साऱ्या गोष्टी पाहून शिक्षक अचंबित झाले. यावेळी काही शिक्षकांनी खासदार, मंत्री आणि अधिकारी यांच्याशी थेट संवाद सुद्धा साधला.या संपूर्ण दौऱ्यात खासदार नीलेश लंके यांच्या देखरेखीखाली करण्यात आली होती. यात निवासाची सोय, वातानुकूलीत बसद्वारे स्थळ दर्शन, वेळच्या वेळी दर्जेदार जेवण व नास्ता या सर्व बाबी अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आल्या. कोणत्याही वगोगटाच्या शिक्षकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली गेली.

सेवा निवृत्त एक शिक्षक

निवृत्तीनंतर समाजात दुर्लक्षीत गेलेल्या शिक्षकांना थेट संसद दर्शन हा अनुभव म्हणजे आमचा सन्मान, आदर आणि आत्मिक समाधान देणारा ठरला. आम्ही आमचे आयुष्य इतरांचे भविष्य घडविण्यात घातले. मात्र आमच्याही भूतकाळाची आठवण ठेवणारे समाजात कोणीतरी आहे याची जाणीव आम्हाला आज झाली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

17 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

2 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

2 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

2 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

2 दिवस ago