क्राईम

शिरूर! निमगाव म्हाळुंगीमध्ये जन्मदात्या मुलाकडून आईची हत्या…

शिरूर : शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे ६० वर्षीय महिलेचा मारहाण करून खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी मृत महिलेच्या मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंदा रामोबा चौधरी (वय ६०, रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर) यांचा त्यांच्या राहत्या घरी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. याप्रकरणी त्यांचे भाऊ भास्कर दशरथ कबाडी (रा. कबाडवाडी, ता. जुन्नर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

फिर्यादीनुसार, १४ जुलै रोजी सायंकाळी आरोपी दिलीप रामोबा चौधरी याने आई कुंदा चौधरी यांना हाताने तसेच कठीण वस्तूने मारहाण करून गंभीर जखमी केले. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात दिलीप रामोबा चौधरी (रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरी पुढील तपास करत आहेत.

शिरूर! निमगाव म्हाळुंगी ग्रामस्थांचा संयम लागला सुटू; बिबट्यांचा कळपच दिसला…

निमगाव म्हाळुंगीत तीस वर्षीय तरुण कामिनी ओढ्यात पडून बेपत्ता…

Video: शिरूर तालुक्यात स्वीट होममधील कामगाराला बेदम मारहाण…

शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई! अपघात टाळण्यासाठी  राष्ट्रीय महामार्गावरील २०० अनधिकृत फ्लेक्स हटवले

शिरुर; बैलगाडा शर्यतीतील वादातून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न; बाप-लेका विरुद्ध गुन्हा दाखल; पाहा Video

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

4 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

5 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

5 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

5 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

6 तास ago

दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी केंद्राकडे मदतीची मागणी; सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

रोहा रेल्वे स्थानकाच्या उन्नतीकरणाच्या भूमिपूजनासाठीही मागितली वेळ मुंबई: महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन दुष्काळग्रस्त…

6 तास ago