महाराष्ट्र

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील ‘या’ गावात धावली बस, गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेना

गडचिरोली: स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्यातील मारकनार गावात सरकारी बस सेवा सुरू झाली, जे एकेकाळी नक्षलवादी हिंसाचाराचे केंद्र म्हणून ओळखळे जात होते. गावात पहिल्यांदा बस पोहोचल्यानंतर गावलकऱ्यांनी राष्ट्रध्वज फडकावून आनंद साजरा केला.या सेवेचा फायदा आसपासच्या गावातील विद्यार्थ्यांसह सुमारे १२०० हून अधिक रहिवाशांना होईल.स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच दुर्गम मारकनार गावातून अहेरीपर्यंत बस सेवा सुरू झाली, याचे श्रेय गडचिरोली पोलिसांना दिले जात आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड उपविभागातील अबुझमदच्या पायथ्याशी असलेले मारकनार गाव हे गाव नक्षलवाद्यांचे केंद्र होते. स्वातंत्र्यापासून या गावात बस धावली नाही, त्यामुळे गावकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या पुढाकाराने या गावात बस सेवा सुरु करण्यात आली. बुधवारी गावात बस पाहून गावकरी गावकऱ्यांना मोठा आनंद झाला. राज्य परिवहन सेवेचे स्वागत करण्यासाठी गावकरी तिरंगा घेऊन जमले. या सेवेचा फायदा मारकनार, मुरुंभुशी, फुलनार, कोपर्शी, पोयरकोठी आणि गुंडुरवाही यासारख्या गावांतील १,२०० हून अधिक रहिवाशांना होईल.

दुर्गम भागात वाहतूक सुलभ करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू केले. १ जानेवारी २०२५ रोजी गट्टा-गरदेवाडा-वांगेटुरी मार्गावर आणि २७ एप्रिल रोजी काटेझर ते गडचिरोली बससेवा सुरू करण्यात आली, असे सांगण्यात आले. गेल्या पाच वर्षांत गडचिरोली पोलिसांच्या संरक्षणाखाली जिल्ह्यात ४२०.९५ किमी लांबीचे २० रस्ते आणि ६० पूल बांधण्यात आले, अशीही माहिती आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

7 तास ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

8 तास ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

13 तास ago

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

16 तास ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

1 दिवस ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

1 दिवस ago