मुंबई: फक्त १२ गुंठ्यासाठी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली. हत्येनंतर महादेव मुंडे यांचे चमडे, हाड आणि रक्त काढून वाल्मिक कराडच्या आणलं होते, असं बाळा बांगर नावाच्या व्यक्तीनं सांगितलं आहे. महादेव मुंडे यांच्या हत्येत गोट्या गित्ते, राजू फड आणि वाल्मिक कराडचा धाकटा मुलगा आहे, असेही बाळा बांगरने सांगितलं आहे, असे आमदार सुरेश धस यांनी म्हटलं आहे. ते विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संबोधित करत होते.
सुरेश धस म्हणाले, “फक्त १२ गुंठ्यासाठी महादेव मुंडे यांची हत्या करण्यात आली आहे. गोट्या गित्ते, राजू फड आणि वाल्मिक कराडचा मुलगा याचा धाकटा मुलगा यांची नावे बाळा बांगर याने माध्यमांसमोर सांगितली आहेत. बांगर हा वाल्मिक कराडसोबत असायचा. बाळा बांगरने सांगितलं की, मी आकाला भेटायला गेलो तेव्हा तिथे माणसाचे चमडे, हाड काढून आणलं होतं. त्यांचे रक्त सुद्धा तेथील टेबलवर ठेवले होते.”
“महादेव मुंडे यांच्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. मग, ज्ञानेश्वरी मुंडे यांची काय चूक आहे? शेवटी पोलीस आयुक्तलायसमोर औषध पिण्याची वेळ आली. गोट्या गित्तेवर मकोका लावण्यात आला आहे. तो वाल्मिक कराडच्या तारखेला न्यायालयात येतो. अशी कारवाई बीडचे पोलीस करत आहेत,” असा संताप धस यांनी व्यक्त केला.
“ज्ञानेश्वरी मुंडे आणि तिचा भाऊ सतीश फड हे दोघेच लढत आहेत. फक्त तपास बदलणे एवढेच काम झाले नाही पाहिजे. बाळा बांगरनं आरोपींची नावे सांगून १५ ते २० होऊन गेले आहेत. एवढ्या दिवसांत आरोपींना अटक करण्यात आली नाही. ज्याची नियुक्ती वाल्मिक कराडने केली आहे. त्याच्याकडे महादेव मुंडे यांचा तपास दिला आहे. तो काय तपास करणार आहे? बाळा बांगरनं विधान केल्यावर आरोपी फरार झाले. जे गुंडांना मदत करतात, अशा पोलीस अधिकाऱ्यांना बदललं पाहिजे. पोलीस कर्मचारी हे सरकारी काम करण्यापेक्षा आकाचे काम करतात हे फोन रेकॉर्ड तपासल्यावर उघड होईल,” असा दावाही धस यांनी केला आहे.
मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…
मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…
बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…
निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…