महाराष्ट्र

गेले दशकभर दादासाहेब फाळके चित्रनगरी घेतेय इफ्फी फिल्म बाजारमध्ये सहभाग

दादासाहेब फाळके चित्रनगरीमुळे मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सहभागाची संधी

पणजी: भारतीय चित्रपट, तंत्रज्ञ आणि देशोदेशीचे निर्माते, चित्रपट यांच्यात व्यवसायाच्या दृष्टीने संवाद घडवून आणणाऱ्या इफ्फी फिल्म बाजारमध्ये गेली दहा वर्ष सातत्याने दादासाहेब फाळके चित्रनगरीने सहभाग घेतला आहे. यंदा गोवा येथे सुरू असलेल्या ५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वेव्हज फिल्म बाजारमध्ये महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने सहभाग घेतला असून येथे श्री गणेशा आणि मुक्काम पोस्ट देवाच घर या दोन चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले.

मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध व्हावे या करिता महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये सहभागी घेतला जातो. गोव्यात होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सहभागाचे हे अकरावे वर्ष आहे. अशा प्रकारे सातत्याने या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभाग घेऊन मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळावी यासाठी प्रयत्नशील असलेले महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य ठरले आहे. यंदा संकेत माने द‍िग्दर्श‍ित मुक्काम पोस्ट देवाचं घर आणि श्री. म‍िल‍िंद कवडे द‍िग्दर्श‍ित श्री गणेशा अशा दोन मराठी चित्रपटांचे प्रदर्शन फिल्म बाजारमध्ये करण्यात येणार आले. महोत्सव कालावधीपर्यंत निवडक चित्रपट रसिकांना पूर्व नावनोंद करून चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

चित्रपट प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

महामंडळातर्फे बाजार विभागात मुक्काम पोस्ट देवाच घर आणि श्री गणेशा या दोन चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

चित्रनगरीचा स्टॉल ठरतोय आकर्षणाचे केंद्र

महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेनुसार गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महत्त्वाच्या बाजार विभागात स्टेट/ कंट्री पॅव्हेलियन मध्ये महामंडळाचा आकर्षक स्टॉल उभा करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनातर्फे चित्रपटकर्मींसाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, बाजार विभागात सहभागी झालेले दोन्ही चित्रपट आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या विविध उपक्रमांची माहिती स्टॉलच्या माध्यमातून देण्यात येत आहे. या शिवाय एन डी स्टुडिओची देखील माहिती देण्यात येत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; तब्बल १ कोटी ५२ लाखांचा २५० किलोहून अधिक गांजा जप्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिसांनी अमली पदार्थ तस्करांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल २५० किलोहून अधिक…

14 तास ago

जांभूळ खाताना या चुका करु नका

जांभूळ खाण्याचे अनेक आरोग्यदायक फायदे आहेत. पोटदुखी, मधुमेह, आमांश, संधीवात आणि इतर अनेक पचन समस्या…

1 दिवस ago

अशी घ्या दातांची काळजी

आपल्या एकंदर आरोग्याचा, सुद‍ृढतेचा आपल्या दातांच्या आरोग्याशी थेट संबंध असतो. दात चांगले असतील तर पचनसंस्थाही…

1 दिवस ago

ताक पितानाची एक लहानशी चूक तुम्हाला पोहचवू शकते दवाखान्यात

ताक हे शरीराला थंडावा देणारे आणि पचनासाठी हलके पेय मानले जाते. त्यामुळे जेवणासोबत किंवा जेवणानंतर…

1 दिवस ago

प्रत्येक नव्या पुलासोबत पूलवजा बंधारा बंधनकारक! पाण्याचा थेंब न थेंब अडविण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

‘व्हीबी-जी रामजी’ योजनेतून मजुरांना काम; एक कोटी शेतकऱ्यांना पाच हजारांची मदत – महसूल मंत्री चंद्रशेखर…

1 दिवस ago

झिशान सिद्दीकी मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी; सिद्धार्थ कांबळेंची प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी!

मुंबई : मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार झिशान सिद्दीकी यांनी आज पक्षाच्या राष्ट्रीय…

1 दिवस ago