महाराष्ट्र

बिहारने जंगलराज नाकारून विकासाला मत दिल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन

पटणा:“मला अभिमान वाटतो की बिहारच्या जनतेने बदल स्वीकारला आहे. त्यांनी विकासराजला पाठिंबा दिला आणि जंगलराजला नाकारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी जींचे मनापासून अभिनंदन करतो आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार जी तसेच त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचेही हार्दिक अभिनंदन करतो,” असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी २० नोव्हेंबर रोजी बिहार राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी समारंभाला उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली.

ते पुढे म्हणाले, “बिहारच्या जनतेने दिलेला हा लँडस्लाईड विजय म्हणजे विकासावर शिक्कामोर्तब आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून विकासासाठी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. तसेच नीतीश कुमार यांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवली व त्यामुळेच बिहारमध्ये आज सकारात्मक बदल दिसत आहे.”

शिंदे म्हणाले, “पूर्वी येथे जे वातावरण होते, ते पूर्णपणे बदलले आहे. आता येथे गुंडाराज नाही; लोकशाही, विकास आणि जनतेचे राज्य आहे. हे शक्य झाले ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या नेतृत्वामुळे. त्यामुळे दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि बिहारच्या जनतेचेही खूप खूप आभार मानतो.”

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

5 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

5 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

5 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

20 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago