सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तोंडवली येथील सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी संचलित भांडुप येथील श्री सरस्वती विद्या मंदिराने चाळीस वर्ष पूर्ण केल्या निमित्ताने *चाळीस वर्षे यशोगाथेची* या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन शाळेचे संचालक वसंत यशवंत सावंत व संचालिका सौ वर्षा वसंत सावंत यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने शैक्षणिक २०२४-२०२५ या वर्षात करण्यात येत आहे. त्यातील एक भाग म्हणून रविवारी शैक्षणिक वर्ष १९९२ ते २०१० या कालावधीत शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या *माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा* आयोजित करण्यात आला होता.
या विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बहुसंख्य विद्यार्थ्यी उच्च शिक्षण प्राप्त करून विविध क्षेत्रात आज उच्चपदस्थ म्हणून कार्यरत आहेत. अशा विद्यार्थ्यांनी विविध उत्तम सांस्कृतिक उदा. नृत्य ,लघु नाट्य, भारुड ,मनोगते इत्यादी कलाकृती सादर करत शाळेतील तो एक दिवस मनमुरादपणे आनंद घेत साजरा केला. बऱ्याच वर्षांनंतर सर्वजण एकत्र भेटल्यामुळे प्रत्येकजण भावुक झाला होता. गतकाळातील आठवणींना उजाळा देत कार्यक्रमाची सांगता झाली. त्या समयी संस्थेचे अध्यक्ष वसंत यशवंत सावंत यांची आवर्जून आठवण काढली. तसेच संस्थेच्या संचालिका सौ वर्षा वसंत सावंत यांनी, ‘उपस्थित विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षेत्रात उज्वल यश मिळवून अव्वल स्थानी असल्याबद्दल अभिनंदन करून त्यांना भावी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.’ असा हा विद्यार्थी स्नेह मीलनाचा कार्यक्रम सर्व विभागांचे विभागप्रमुख, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थी कोअर कमिटी सदस्य यांच्या साह्याने यशस्वीरित्या संपन्न झाला.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…