महाराष्ट्र

गारपीठीने शेतकरी आडवा झालाय आणि पंचनामे करायला कोण नाही…

अध्यक्षमहोदय, या सरकारला आदेश काढावेत त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही; अजित पवार

मुंबई: सात दिवस झाले सरकारी कर्मचारी संपावर आहे आणि सरकार यावर तोडगा काढायला तयार नाही. जी गारपीठ झाली त्याने शेतीचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आडवा झाला आहे. मात्र पंचनामे करायला कोण नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय आपण जबाबदार व्यक्ती आहात या सरकारला आदेश काढावेत त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला खडसावले.

राज्यात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत अजित पवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडला आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान तुम्हाला हक्क, अधिकार मागण्या मागायचा आहे परंतु माणुसकीची भावना ठेवून पंचनामे करावेत असे आवाहन अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांना केले.

गारपीठीने ८ शेतकरी मृत्यूमुखी पडले आहेत. जनावरे मृत्युमुखी पडली आहे. फळबांगांचे अतोनात नुकसान झाले आहे. ज्यावेळी अधिवेशन सुरु असते. त्यावेळी लोकांचे लक्ष असते. यातून न्याय मिळेल. शेतकरी अडचणीत आले आहेत. आणि सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे सत्ताधार्‍यांकडून सामंजस्याने काम करण्याची आवश्यकता असताना सरकारमधील आमदार संजय गायकवाड यांनी ७५ टक्के कर्मचारी हरामाची कमाई खातात असे वक्तव्य केले. अशा पध्दतीने सर्व कर्मचार्‍यांना एका रेषेत धरणार तर कामे कशी होणार असा सवालही अजित पवार यांनी यावेळी केला.

काही तालुक्यात शाळा पालक आणि लोकं चालवत आहेत. अतिशय गंभीर परिस्थिती राज्यात शेतकऱ्यांची निर्माण झाली आहे आणि सरकार दुर्लक्ष करतेय त्यामुळे सभात्याग करत असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी सभात्याग केला.

गारपीठीने प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी हतबल झाला आहे. संप सुरु आहे. पंचनामे करायला कोण नाही. महसुल नियमानुसार आज ताबडतोब रक्कम जाहीर करावी. आणि वाटप सुरु करावे. आजच्या आज उपाययोजना करावी. तात्काळ निर्णय करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

11 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

11 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

11 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

11 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

17 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

17 तास ago