गोळीबार करुन दोघांचा जीव घ्यायला ही काय मोगलाई आहे का?
मुंबई: मुलाच्या गाडीचा अपघात झाल्यावर स्थानिकांशी झालेल्या वादानंतर ठाण्याचा माजी नगरसेवक मदन कदम याने सातारा जिल्ह्यातल्या मोरणा (ता. पाटण) येथे गोळीबार केला. या घटनेत दोन स्थानिकांचा मृत्यू झाला तर एकजण अत्यवस्थ आहे. किरकोळ कारणावरुन गोळीबार करुन दोघांचा जीव घ्यायला ही काय मोगलाई आहे का? असा संतप्त सवाल करुन राज्यातल्या कायदा-सुवव्यस्थेच्या प्रश्नी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक झाले.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, (दि. 15) मार्च रोजी ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम यांच्या मुलाच्या वाहनाचा मोरणा परिसरात अपघात झाला होता. अपघातावेळी त्यांची स्थानिकांशी बाचाबाची झाली होती. त्यानंतरही दोन तीन दिवसांनी स्थानिक ग्रामस्थ व कदम यांच्यात वादावादी झाली होती. याचा राग मनात धरुन रविवारी रात्री ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम याने मोरणा भागात बेछुट गोळीबार केला. या घटनेत दोन स्थानिक व्यक्तींचा मुत्यू झाला.
तसेच तेथील एका सोसायटीची निवडणुक व पवनचक्कीचे प्रलंबित पेमेंट हा विषय सुध्दा या गोळीबाराच्या पाठीमागे आहे. या घटनेत मृत व्यक्तींमध्ये मंत्री शंभुराज देसाई यांचा कार्यकर्ता आहे. या गोळीबाराच्या घटनेमुळे मोरणा खोऱ्यातील गुरेघर धरण परिसरात स्थानिकांच्यामध्ये दहशतीचे वातावरण आहे. या प्रकरणात मदन कदम व त्यांच्या दोन मुलांना अटक केली असली तरी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…