महाराष्ट्र

पावसाळ्यात मुंबईत शून्य जिवितहानीचे उद्दिष्ट; यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: पावसाळ्यात मुंबई आणि महानगर परिसरात शून्य जिवितहानी हे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबई आणि परिसरातील पावसाळापूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्यांनी प्रशासनाला विविध सूचना केल्या.

दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीस मुंबई महापालिका, रेल्वे, पोलीस, सिडको, म्हाडा, एमएमआरडीए, एसआरए, तटरक्षक दल, नौदल, एनडीआरएफ आणि बेस्ट विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्याने यंत्रणांना तयारीसाठी अतिरिक्त वेळ मिळाला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी नालेसफाईची कामे अपूर्ण आहेत ती तातडीने पूर्ण करावीत. तसेच होल्डिंग पाँड, फ्लड गेट्स कार्यान्वित ठेवणे, दरडप्रवण भागांत संरक्षण जाळी बसविणे, होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे आणि झाडे कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे.

मुंबई महापालिकेने एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतंत्र आपत्ती प्रतिसाद दल उभारण्याचाही विचार करावा, अशी सूचना त्यांनी केली. पावसाळ्यात वाहतूक विस्कळीत झाल्यास पर्यायी व्यवस्था तयार ठेवण्यासाठी बेस्ट आणि एसटी प्रशासनाने नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.दरम्यान, मुंबईतील २ हजार किलोमीटर रस्त्यांपैकी सुमारे १,७०० किलोमीटर रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून त्यामुळे रस्ते व खड्डे दुरुस्तीवरील खर्चात सुमारे ८० टक्के घट झाल्याची माहितीही शिंदे यांनी दिली.

बैठकीत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबईत १२५ पर्जन्यमापक यंत्रे कार्यरत आहेत. जून ते सप्टेंबर या कालावधीत २४ दिवस साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या भरतीचे दिवस असणार आहेत. शहरातील ९३४ ठिकाणी पाणी उपसण्यासाठी पंप बसविण्यात आले असून ६५ मिनी पंपिंग स्टेशन कार्यरत आहेत. यंदा स्मार्ट पंप व्यवस्थापन प्रणाली सुरू करण्यात आली असून नियंत्रण कक्षातून त्याचे निरीक्षण केले जाणार आहे.

मुंबईत आपत्ती व्यवस्थापनासाठी १ हजार ‘आपदा मित्र’, एनडीआरएफची ३ पथके आणि नौदलाची ९ पथके सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने यावेळी दिली.पावसाळ्यात नागरिकांना कमीत कमी त्रास होईल आणि कोणतीही जीवितहानी होणार नाही यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

3 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago