औरंगाबाद: राज्यातील ग्रामीण भागातील सर्व रस्त्यांना कोड देण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणं सोपं होणार तसेच वाद संपुष्टात येणार.
कोणते रस्ते समाविष्ट
ग्रामीण रस्ते – गाव ते गाव जोडणारे
हद्दीचे रस्ते – ग्रामसीमा जोडणारे
गाडी मार्ग (१६ ते २१ फूट रुंदी)
पाय मार्ग (८ ¼ फूट रुंदी)
शेतावर जाणारे पायमार्ग व गाडीमार्ग
गावपातळीवर काय होणार
तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल व पोलीस पाटील मिळून रस्त्यांची यादी तयार करतील.
ग्रामसभेत यादीला मान्यता मिळाल्यानंतर ती तहसीलदारांकडे सुपूर्द होईल.
सीमांकन व भूअभिलेख विभाग
डिजिटल नकाशे (Geo-referencing) वापरून रस्त्यांची अचूक मोजणी
सीमांकनानंतर दुतर्फा झाडे लावण्याचे आदेश कायम
अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही
तहसीलदार नोटीस देतील
सुनावणीनंतर अतिक्रमण हटवले जाईल
पोलिस मदत आवश्यक असल्यास घेतली जाईल
रस्त्यांना मिळणारा विशेष कोड
जिल्हा + तालुका + गाव + रस्ता क्रमांक + रस्ता प्रकार
रस्त्यांच्या प्रकारासाठी वापरले जाणारे इंग्रजी कोड
A = Double Line
B = Double Dotted Line
C = Single Dotted Line
D = वापरात पण नकाशात नाही
E = शिव/पाणंद रस्ते
अभिलेख व नोंदी
प्रत्येक गावासाठी विशेष नमुना तयार होईल. नागरिक व शेतकरी सहज रस्त्यांची माहिती ऑनलाइन पाहू शकतील. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा त्रास कमी होईल, रस्त्यांची नोंद कायमस्वरूपी राहील आणि वाद संपुष्टात येतील.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …