महाराष्ट्र

डोंबिवलीत ‘भव्य तिरंगा यात्रा’ संपन्न

भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या ३ डोंबिवलीकरांसह सर्व पीडितांना आपल्या भारतीय सशस्त्र दलाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला. या ऑपरेशनदरम्यान भारतमातेच्या वीरपुत्रांनी दाखविलेल्या शौर्य, संयम आणि बलिदानाच्या सन्मानार्थ डोंबिवलीत ‘भव्य तिरंगा यात्रा’ भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

श्री गणपती मंदिर संस्थान येथून गणरायाच्या आशीर्वादाने सुरू झालेली तिरंगा यात्रा इंदिरा चौक – पीपी चेंबर्स – सर्वेश हॉल – पारसमणी नाका करत छत्रपती शिवाजी महाराज चौक (घरडा सर्कल) येथे पोहोचली. डोंबिवलीचे वीरपुत्र कॅप्टन विनयकुमार सच्चान स्मारक येथे त्यांच्या पुण्यस्मृतींस अभिवादन करून यात्रेचा समारोप झाला.

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील नवा भारत प्रसंगी दहशतवादाविरुद्ध किती कठोर, कणखर होऊ शकतो; हे ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे जगाने पाहिले. यानिमित्ताने दिसलेल्या नव्या भारताच्या लष्करी सामर्थ्यासोबतच कोट्यवधी भारतीयांची एकजूट हे ‘ऑपरेशन सिंदूर’चे यश आहे, अशी ग्वाही यात्रा समारोपाप्रसंगी दिली.

या यात्रेदरम्यान आ. सुलभाताई गायकवाड, आ. राजेश मोरे, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, गुलाबराव कारंजुले, नरेंद्र पवार, नाना सूर्यवंशी, नंदू परब, नंदू जोशी यांच्यासह पवन पाटील, प्रियाताई जोशी, करण जाधव, धनाजी पाटील, मंदार टावरे, समीर भंडारे, रितेश फडके, सचिन काटे, अमित धात्रस, विजय उपाध्याय, नितेश म्हात्रे, संतोष शेलार, मितेश पेणकर आदी मंडल अध्यक्ष उपस्थित होते. तसेच डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडमीमधील प्रशिक्षणार्थी आणि मोठ्या संख्येने कल्याण-डोंबिवलीकर या यात्रेत सहभागी झाले होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बाह्य राजकीय हस्तक्षेपाला आळा; पारदर्शक निवडणुकांसाठी तज्ज्ञ समिती गठित

मुंबई: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी लागू असलेल्या एकरूप परिनियमांच्या अनुषंगाने विद्यार्थी…

9 तास ago

तृणमूलच्या पक्षचिन्ह वादात शिवसेना प्रकरणाचा दाखला; सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला ‘विलंबा’वरून सवाल

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसमधील पक्षचिन्हाच्या वादावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान शिवसेना पक्षातील वादाचा…

9 तास ago

दिशा सालियान प्रकरणावर सूरज पांचोलीची मोठी पोस्ट; म्हणाला…

मुंबई : दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान प्रकरणावर अभिनेता सूरज पांचोलीने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट…

9 तास ago

नर्सिंग विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; घरामागे आढळला १८ वर्षीय हरिणीचा मृतदेह

तेलंगणातील भद्राद्री कोठगुडेम जिल्ह्यात खळबळ; शरीरावर जखमांच्या खुणा, शेजाऱ्यावर संशय; पोलिसांकडून सखोल तपास सुरू तेलंगणा:…

10 तास ago

पंतप्रधानांच्या हस्ते प्रेरणास्थळाचे उद्घाटन; एआय संस्थेचीही पाहणी, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा

बारामती: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्याची तारीख अखेर निश्चित…

10 तास ago

कलाकारांना मुंढेंचा इशारा; ‘लोकप्रियता म्हणजे कायद्यापासून संरक्षण नव्हे’

मुंबई : आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकणाऱ्या उत्पादनांच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवर महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने…

10 तास ago