क्राईम

शिरूर येथे भीषण अपघात; डंपरच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

शिरूर (अरुणकुमार मोटे): मांडवगण फराटा ( ता. शिरूर) येथे दिनांक १७ मे रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. सदर अपघात मांडवगण फराटा ते वडगाव रासाई जाणाऱ्या रस्त्यावर रोहीदास थोरात यांच्या घराजवळ घडला.

या अपघातात मृत झालेले व्यक्ती म्हणजे सागर संभाजी कोळपे (वय 28), रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर) आणि यश सुधाकर भिसे (वय 12), सध्या रा. मांडवगण फराटा, मुळ रा. खेडवाडी, ता. गेवराई, जि. बीड) हे असून, अनिल बीरा कोळपे हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.

फिर्यादी दादा बाळासो कोळपे (वय 38), रा. कोळपेवस्ती, मांडवगण फराटा) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, डंपर क्रमांक MH 42 SEQ 7696 या वाहनाच्या अज्ञात चालकाने वाहन हायगाईने, अविचाराने आणि भरधाव वेगात चालवत समोरून येणाऱ्या पीकअप क्रमांक MH 03 OE 0638 ला रॉंग साईडने धडक दिली. त्यामुळे सागर कोळपे आणि यश भिसे यांचा जागीच मृत्यू झाला तर अनिल कोळपे जखमी झाले. अपघात घडल्यानंतर डंपर चालक अपघातस्थळावरून न थांबता पळून गेला.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 341/2025 अन्वये भारतीय दंड संहिता कलम 279, 304(अ), 337, 338, 427, मोटार वाहन कायदा कलम 184, 134/177 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नकाते यांच्याकडे असून, प्रभारी अधिकारी संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन हे मार्गदर्शन करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बाह्य राजकीय हस्तक्षेपाला आळा; पारदर्शक निवडणुकांसाठी तज्ज्ञ समिती गठित

मुंबई: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी लागू असलेल्या एकरूप परिनियमांच्या अनुषंगाने विद्यार्थी…

10 तास ago

तृणमूलच्या पक्षचिन्ह वादात शिवसेना प्रकरणाचा दाखला; सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला ‘विलंबा’वरून सवाल

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसमधील पक्षचिन्हाच्या वादावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान शिवसेना पक्षातील वादाचा…

10 तास ago

दिशा सालियान प्रकरणावर सूरज पांचोलीची मोठी पोस्ट; म्हणाला…

मुंबई : दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान प्रकरणावर अभिनेता सूरज पांचोलीने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट…

10 तास ago

नर्सिंग विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; घरामागे आढळला १८ वर्षीय हरिणीचा मृतदेह

तेलंगणातील भद्राद्री कोठगुडेम जिल्ह्यात खळबळ; शरीरावर जखमांच्या खुणा, शेजाऱ्यावर संशय; पोलिसांकडून सखोल तपास सुरू तेलंगणा:…

10 तास ago

पंतप्रधानांच्या हस्ते प्रेरणास्थळाचे उद्घाटन; एआय संस्थेचीही पाहणी, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा

बारामती: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्याची तारीख अखेर निश्चित…

10 तास ago

कलाकारांना मुंढेंचा इशारा; ‘लोकप्रियता म्हणजे कायद्यापासून संरक्षण नव्हे’

मुंबई : आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकणाऱ्या उत्पादनांच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवर महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने…

11 तास ago