महाराष्ट्र

विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅब! जाऊन घ्या शासनाच्या महाज्योती मोफत टॅब योजना 2025 बद्दल

संभाजीनगर: आजच्या डिजिटल युगात शिक्षण हे केवळ पुस्तकी न राहता तंत्रज्ञानावर आधारित होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) तर्फे इतर मागास वर्ग (OBC), विमुक्त जाती – अ (VJ-A), भटक्या जमाती – ब (NT-B), भटपा जमाती – क (NT-C), भटक्या जमाती – ड (NT-D), विशेष मागास प्रवर्ग (SBC) मधील विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

मोफत टॅब: उच्च शिक्षणासाठी आवश्यक असलेले टॅबलेट विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत दिले जाईल.

आर्थिक सहाय्य: गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण खर्चात मोठा आधार.

डिजिटल साक्षरता: विद्यार्थी डिजिटल साधनांचा वापर शिकतील आणि आधुनिक जगात टिकतील.

उच्च शिक्षणाला प्रोत्साहन: आर्थिक अडचणीतही आत्मविश्वासाने पुढे जाण्याची संधी.

गुणवत्तापूर्ण शिक्षण: ऑनलाईन शिक्षण आणि उत्कृष्ट स्रोतांपर्यंत थेट पोहोच.

पात्रता निकष:

महाराष्ट्राचा रहिवासी असावा

OBC, VJNT किंवा SBC प्रवर्गातील विद्यार्थी

मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेत उच्च शिक्षण घेत असावा

शासन निश्चित उत्पन्न मर्यादेत येणारे कुटुंब

शैक्षणिक संस्थेची शिफारस असावी

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 

महाज्योतीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या https://mahajyoti.org.in/en/home/

“Notice Board” विभाग तपासा https://mahajyoti.org.in/en/notice-board/

संबंधित योजनेची लिंक निवडा

आवश्यक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करा

अर्ज सबमिट करून प्रिंटआउट ठेवा

उदाहरण

MHT-CET/JEE/NEET 2025 साठी अर्ज https://mahajyoti.org.in/en/application-for-mht-cet-jee-neet-2025-training-2/

महत्त्वाच्या सूचना

चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो

कागदपत्रे स्पष्ट स्कॅन करून अपलोड करा

अर्जाची अंतिम तारीख “Notice Board” वर तपासा

अधिक माहितीसाठी हेल्पलाइन किंवा कार्यालयात संपर्क साधा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बाह्य राजकीय हस्तक्षेपाला आळा; पारदर्शक निवडणुकांसाठी तज्ज्ञ समिती गठित

मुंबई: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी लागू असलेल्या एकरूप परिनियमांच्या अनुषंगाने विद्यार्थी…

9 तास ago

तृणमूलच्या पक्षचिन्ह वादात शिवसेना प्रकरणाचा दाखला; सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला ‘विलंबा’वरून सवाल

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसमधील पक्षचिन्हाच्या वादावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान शिवसेना पक्षातील वादाचा…

9 तास ago

दिशा सालियान प्रकरणावर सूरज पांचोलीची मोठी पोस्ट; म्हणाला…

मुंबई : दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान प्रकरणावर अभिनेता सूरज पांचोलीने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट…

9 तास ago

नर्सिंग विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; घरामागे आढळला १८ वर्षीय हरिणीचा मृतदेह

तेलंगणातील भद्राद्री कोठगुडेम जिल्ह्यात खळबळ; शरीरावर जखमांच्या खुणा, शेजाऱ्यावर संशय; पोलिसांकडून सखोल तपास सुरू तेलंगणा:…

9 तास ago

पंतप्रधानांच्या हस्ते प्रेरणास्थळाचे उद्घाटन; एआय संस्थेचीही पाहणी, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा

बारामती: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्याची तारीख अखेर निश्चित…

9 तास ago

कलाकारांना मुंढेंचा इशारा; ‘लोकप्रियता म्हणजे कायद्यापासून संरक्षण नव्हे’

मुंबई : आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकणाऱ्या उत्पादनांच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवर महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने…

9 तास ago