महाराष्ट्र

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याबाबत सरकारला ८ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने रस्ता उभारण्यात आलेल्या ठिकाणी त्यांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा होऊनही तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा मुद्दा विधानपरिषद सदस्य हेमंत पाटील यांनी लक्षवेधी द्वारे विधान परिषदेत उपस्थित केला होता.“हा पुतळा नेमक्या किती दिवसांत उभारला जाणार?” असा प्रश्न त्यांनी सरकारकडे केला.यावर उत्तर देताना राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी, “पूर्ण माहिती घेतल्यानंतरच मी याबाबत बोलू शकेन. सन्माननीय सदस्यांना संपूर्ण माहिती घेऊन कळवू,” असे सांगितले.

या चर्चेदरम्यान पीठासीन अधिकारी म्हणून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, हा विषय केवळ एका सदस्यापुरता मर्यादित नसून जनतेशी निगडित आहे. अधिवेशन सुरू असताना सरकारने आठ दिवसांच्या आत याबाबत सविस्तर लेखी निवेदन सादर करावे, अशी त्यांनी विनंती केली.

तसेच समृद्धी महामार्गावर सुरू असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या २२ फूड जॉईंट्सबाबत प्रत्यक्षात सुविधा उपलब्ध नसल्याच्या तक्रारी येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. संबंधित अधिकाऱ्यांकडून त्या २२ ठिकाणांची सकाळी व संध्याकाळी स्थिती दर्शवणारे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून पुढील आठवड्यात दाखवावे, अशीही त्यांनी सूचना केली.

“आम्ही आमदारांनी वारंवार सांगण्यापेक्षा प्रशासनानेच प्रत्यक्ष स्थिती स्पष्ट करावी. आम्हाला व संबंधित आमदारांना प्रत्यक्ष दाखवा,” असे त्यांनी नमूद केले.

महिलांच्या स्वच्छतागृहांच्या सुविधांबाबतही समस्या कायम असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. “मी स्वतः नुकतीच नाशिकला जाऊन आले असून पुन्हा भेट देणार आहे. कागदोपत्री कामे पूर्ण दाखवली जात असली तरी प्रत्यक्षात काही ठिकाणी सुविधा उपलब्ध नाहीत, अशा तक्रारी लोकांकडून येत आहेत. सुपरव्हिजनमध्ये काही त्रुटी राहात आहेत का, याचीही तपासणी होणे आवश्यक आहे,” असे त्या म्हणाल्या.

समृद्धी महामार्गावरील सुविधा, रेस्टॉरंट्स व सेवा केंद्रांची अचूक माहिती गुगल मॅपवर अद्ययावत करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले, जेणेकरून प्रवाशांना प्रत्यक्ष सुरू असलेल्या सुविधा सहज उपलब्ध होतील.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago