लातूर: औरंगाबाद व उस्मानाबाद शहराच्या नामांतराबाबत केंद्र सरकार व राज्य सरकारने काढलेल्या परीपत्रकात तफावत आहे. यावरून संभाजीनगर व धाराशिव नामांतराबाबत राज्य सरकारची भूमिका संशयास्पद वाटते, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. आज लातूर येथे शिवगर्जना अभियान कार्यक्रमाला सुरुवात झाल्यावर दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला,त्यावेळी ते बोलत होते.
केंद्राने नामांतराच्या परिपत्रकात दुरुस्ती केली पाहिजे. संपूर्ण जिल्ह्याच्या नाव संभाजीनगर करावं. नामांतराच्या मुद्द्यावरून कोणी कोर्टात जायला हवं अस राज्य सरकारला वाटतंय की काय अशी शंका देखील दानवेंनी राज्य सरकारच्या हेतूबद्दल बोलून दाखवली. केंद्र व राज्य सरकारने काढलेल्या नामांतराच्या परीपत्रकात एकसंधता यायला हवी, अन्यथा नामांतरला गडांतर येऊ शकतं अशी भीती देखील दानवे यांनी व्यक्त केली. संघर्षानंतर हे नामांतर झालं त्यावर पाणी पडू नये असं मत दानवे यांनी व्यक्त केलं.
शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…