मुंबई: जिष्णू देव वर्मा यांची काल मुंबई येथील ‘लोकभावन’ येथे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) ची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी, राज्यातील विद्यापीठांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील रँकिंग सुधारण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे तसेच तांत्रिक शिक्षणात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याबाबत चर्चा झाली.विद्यार्थ्यांना अधिकाधिक शैक्षणिक व संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यपालांना दिली.
महाराष्ट्र राज्य शिक्षणाच्या क्षेत्रात देशात नेहमीच अग्रस्थानी राहिले असून राज्यातील विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता अधिक बळकट करण्यासाठी शासनाचे प्रयत्न महत्त्वाचे असल्याचे राज्यपालांनी नमूद केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्यातील उच्च शिक्षण अधिक सक्षम आणि गुणवत्तापूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल उपस्थित होते.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…