महाराष्ट्र

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक आणि अवेळी खंडित होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या अघोषित भारनियमनाची गंभीर दखल घेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले.

कृषीपंपांचा वीजपुरवठा कमी दाबाने, अचानक आणि अवेळी खंडित का केला जात आहे, असा सवाल करत शेतकऱ्यांना वेठीस धरू नका, असे निर्देश पालकमंत्र्यांनी महावितरणला दिले. ग्राहकांशी उद्धट वर्तन केल्याच्या तक्रारींचीही त्यांनी गंभीर दखल घेतली. पंढरपूरच्या कार्यकारी अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गोरे यांनी जिल्हाधिकारी आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची आढावा बैठक घेतली. आपत्कालीन भारनियमन कायमस्वरूपी टाळण्यासाठी तांत्रिक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. वीजपुरवठा खंडित करणे अपरिहार्य असल्यास त्याची वेळ, कालावधी आणि कारण शेतकऱ्यांना आधीच कळविण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारावी, असेही निर्देश देण्यात आले.

शेतकऱ्यांशी उद्धट वर्तन खपवून घेणार नाही

वीज समस्येबाबत तक्रार घेऊन येणाऱ्या शेतकरी आणि ग्राहकांशी उद्धट वर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पालकमंत्र्यांनी दिला. पंढरपूरच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.

‘५५ टीएमसी पाणी वाहून गेले तेव्हा पालकमंत्री कुठे होते?’

दरम्यान, पालकमंत्र्यांच्या भूमिकेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पलटवार केला आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी पालकमंत्र्यांच्या भूमिकेला ‘दिखाऊपणा’ असल्याची टीका केली.

“उजनी धरण ओसंडून वाहत असताना तब्बल ५५ टीएमसी पाणी कर्नाटकात वाहून गेले. मात्र, जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये कालवे किंवा उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून हे पाणी साठवून घेण्याचे नियोजन झाले नाही,” असा आरोप रणदिवे यांनी केला.

नदीकाठच्या भागातील वीजपुरवठा वेळेवर सुरळीत न झाल्याने ऊस उत्पादकांचे मोठे नुकसान झाल्याचा दावाही त्यांनी केला. आता केवळ सहानुभूतीचा देखावा करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याची टीका करत, ‘बैल गेला अन् झोपा केला’ अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पालकमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.अघोषित भारनियमन, विस्कळीत वीजपुरवठा आणि सिंचनाच्या प्रश्नावरून आता पालकमंत्री विरुद्ध शेतकरी संघटना असा संघर्ष रंगण्याची चिन्हे आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

42 मिनिटे ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

56 मिनिटे ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

1 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

1 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

1 तास ago

शिरुर; उरळगावच्या शेतकऱ्यांची तंत्रज्ञानाकडे वाटचाल; पीक पद्धतीवर आधारित प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

न्हावरे (अक्षय टेमगिरे) आधुनिक शेतीत बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन उत्पादनवाढ, खर्चात बचत आणि शेती…

2 तास ago