आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जवळचे नातेवाईक पुढे आले नाहीत. अखेर अवसरी खुर्द ग्रामपंचायतीने माणुसकीच्या नात्याने पुढाकार घेत त्यांच्या अंत्यविधीची जबाबदारी स्वीकारली आणि सन्मानाने अखेरचा निरोप दिला. विशेष म्हणजे, हिंदू धर्मशास्त्रानुसार त्यांच्या दशक्रियाविधीचीही व्यवस्था ग्रामस्थांनी केली.
रामदास शिंदे हे शुक्रवारी (ता. ४) सकाळी मंचर येथील मारुती मंदिराजवळ बसले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांच्या आधारकार्डवर अवसरी खुर्द येथील रहिवासी असल्याची नोंद आढळली. मात्र, जवळचे नातेवाईक उपलब्ध नसल्याने मंचर पोलिसांनी त्यांची बेवारस म्हणून नोंद केली.
यानंतर अवसरी खुर्दचे पोलिस पाटील संतोष शिंदे यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे प्रशासक तथा माजी सरपंच प्रसाद दत्तात्रय कराळे आणि भीमाशंकर कारखान्याचे संचालक आनंदराव शिंदे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. प्रसाद कराळे यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांशी चर्चा करून शिंदे यांच्या अंत्यविधीची जबाबदारी स्वीकारली.
शुक्रवारी सायंकाळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत हिंदू धर्मशास्त्रानुसार त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर शनिवारी (ता. ५) सकाळी साडेसात वाजता त्रिवेणी संगम येथे दशक्रियाविधी पार पडला. यावेळी काकस्पर्शही झाला.
रक्ताचे नातेवाईक अखेरच्या प्रवासात सोबत नसले, तरी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी माणुसकीचे नाते जपत रामदास शिंदे यांना सन्मानाने अखेरचा निरोप दिला. या घटनेने उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू आणले. नात्यांची व्याख्या केवळ रक्ताच्या संबंधांपुरती मर्यादित नसते, तर प्रसंगी माणुसकीचे नातेच सर्वांत मोठे ठरते, याची जाणीव करून देणारी ही घटना ठरली.‘माणुसकी अजूनही जिवंत आहे’, असा भावनिक संदेश या घटनेतून समाजासमोर आला आहे.
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…
पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) आधुनिक शेतीत बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन उत्पादनवाढ, खर्चात बचत आणि शेती…