महाराष्ट्र

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे. दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली असताना सरकार मात्र बैठका आणि चर्चांमध्ये वेळ घालवत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहत आहे, असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडे हेक्टरी १ लाख रुपये मदत, सरसकट कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी केली.

सपकाळ यांनी आज बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी एका तरुण शेतकऱ्याची भेट घेतली. या शेतकऱ्याने तब्बल २० एकर सोयाबीनचे पीक मोडीत काढण्याचा निर्णय घेतला असल्याचे सपकाळ यांनी सांगितले.

“मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी आपल्या शेताची अवस्था पाहण्यासाठी यावे,” अशी आर्त विनंती संबंधित शेतकऱ्याने केली होती. मात्र, कोणीही त्याची भेट घेतली नाही, असा दावा सपकाळ यांनी केला. कृषीमंत्री बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतानाही त्यांनी या शेतकऱ्याची भेट घेतली नसल्याचे सपकाळ म्हणाले.

“महायुती सरकार हे आंधळं, बहिरं आणि मुकं सरकार आहे,” अशी टीका करत सपकाळ म्हणाले की, शेतकरी सरकारकडे मायबाप म्हणून आशेने पाहत आहे. मात्र, सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल असल्याचे दिसत नाही. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचे सांत्वन करणे हे आपले कर्तव्य असल्याने आपण त्याची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले.

दुष्काळ हा राजकारणाचा विषय नसल्याचे सांगत सपकाळ म्हणाले की, “सरकारने या संकटाकडे गांभीर्याने पाहून सकारात्मक प्रतिसाद देण्याची गरज आहे.” राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट असून त्यांना तातडीने आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

दुष्काळाच्या प्रश्नावर बोलावलेल्या बैठकीत सत्ताधारी पक्षाचे खासदार काजू-बदाम खात असल्याची टीका करत सपकाळ यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. सरकारकडे शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत संवेदना नसल्याचा आरोप त्यांनी केला.

शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी काँग्रेस पक्ष सत्याग्रह करत असून कार्यकर्ते गावोगावी आंदोलन करत असल्याचेही सपकाळ यांनी सांगितले. सरकारने तातडीने मदत जाहीर केली नाही तर मंत्री तसेच सत्ताधारी पक्षाच्या आमदार-खासदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

कर्जमाफीच्या दाव्यावरही सवाल

महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. बुलढाणा जिल्ह्यातील एका गावाचे उदाहरण देताना ते म्हणाले की, कर्जमाफीच्या पहिल्या यादीत दोन शेतकऱ्यांची नावे होती, तर दुसऱ्या यादीत एका शेतकऱ्याचे नाव आले. संबंधित शेतकऱ्याला केवळ ४० हजार रुपयांची कर्जमाफी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारकडून करण्यात येणारे दावे आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यामध्ये मोठा फरक असल्याचा आरोप करत सपकाळ यांनी शेतकऱ्यांसाठी तातडीने ठोस मदत जाहीर करण्याची मागणी केली.दरम्यान, शेतकऱ्यांनी हवालदिल होऊ नये आणि आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहनही हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

13 मिनिटे ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

16 तास ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

16 तास ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

21 तास ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

1 दिवस ago

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

2 दिवस ago