मुंबई: ब्रँड्स मेकर्स व मुंबईचा गणेशोत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हॅश टॅग बाप्पा’ उपक्रमांतर्गत डॉक्टर भूषण जाधव व शशिकांत पवार (शाखाप्रमुख २१७) यांच्या सहकार्याने बाप्पाचे भाविक व सेवेकर्याच्या सेवेचा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.’हॅश टॅग बाप्पा’ उपक्रमाच्या माध्यमातून यंदा प्रथमच गणेशोत्सवामध्ये मुंबईतील विविध भागांत एकूण ६०,००० पौष्टिक ‘ग्रीक योगर्ट’ चे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शनिवारी रात्री मरिन लाईन्ससह ‘खेतवाडी गिरगांव’ येथे गणेश दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तसेच गणपती मंडळांना पौष्टिक ‘ग्रीक योगर्ट’ चे वाटप करण्यात आले. शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर, माईमिडिया24 च्या शीतल करदेकर, चेतन काशीकर, प्रानुभूती फाऊंडेशनचे डॉ भूषण जाधव, मुन चॅरिटेबल ट्रस्ट चे रवी जैन, ब्रँड्स मेकरचे भरत शिंदे, समाज सेवक शशिकांत पवार, रोहित महाडिक यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. पुढील दोन / तीन दिवसात लालबाग, फोर्ट, दादर, सांताक्रूझ, अंधेरी, या ठिकाणी ‘ग्रीक योगर्ट’ चे वाटपाने आगळावेगळी सेवा गणेशचरणी रुजू होणार आहे.
मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…
आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…
सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…
धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…
लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…