महाराष्ट्र

हृदयद्रावक! मेकॅनिकच्या एका सल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; 3 भावंडांसह आजोबांचा झोपेत गुदमरून मृत्यू

आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दुचाकीच्या धुरामुळे निर्माण झालेल्या कार्बन मोनोऑक्साइड वायूच्या विषबाधेमुळे घरात झोपलेल्या दोन जुळ्या बहिणी, त्यांचा भाऊ आणि आजोबा अशा चौघांचा झोपेतच गुदमरून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुरली नावाचा व्यक्ती हेअर सलून चालवतो. त्याने नुकतीच आपली दुचाकी दुरुस्त करून आणली होती. संबंधित मेकॅनिकने दुचाकीचे इंजिन रात्रभर चालू ठेवण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार मुरलीने दुचाकी घराच्या आत उभी करून इंजिन सुरू ठेवले. ज्या खोलीत त्याची दोन मुले आणि वडील झोपले होते, त्या खोलीचे दरवाजे आणि खिडक्या बंद होत्या. मुरली आणि त्याची पत्नी मात्र घराच्या टेरेसवर झोपायला गेले होते.

दरम्यान, दुचाकीच्या सायलेंसरमधून निघणारा धूर बंद खोलीत साचत गेला आणि त्यातून जीवघेणा कार्बन मोनोऑक्साइड वायू तयार झाला. रात्रीच्या वेळी या विषारी वायूमुळे खोलीतील ऑक्सिजनची पातळी कमी झाली आणि झोपेतच चौघांचा गुदमरून मृत्यू झाला.

मृतांमध्ये चंदना (वय 8), चरिता (वय 8), कार्तिक (वय 15) आणि रामचंद्रय्या (वय 70) यांचा समावेश आहे. रविवारी सकाळी घराचा दरवाजा उघडल्यानंतर हे चौघेही मृतावस्थेत आढळले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, कार्बन मोनोऑक्साइड हा रंगहीन आणि गंधहीन वायू असून त्याला ‘सायलेंट किलर’ असेही म्हटले जाते. पेट्रोल, गॅस किंवा कोळसा अपुऱ्या हवेत जळल्यास हा वायू तयार होतो. बंद जागेत वाहनाचे इंजिन, जनरेटर किंवा रूम हिटर चालू ठेवल्यास हा वायू प्राणघातक ठरू शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या उपकरणांचा वापर करताना पुरेशी हवा खेळती राहील याची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

13 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

17 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

17 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

17 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

17 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

18 तास ago