महाराष्ट्र

चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांचा थरार! महिलेवर झुंडीचा हल्ला; अंगाचे लचके तोडून ठार

चाकण: चाकण शहरातील पुणे–नाशिक महामार्गालगत आंबेठाण चौकाजवळील उड्डाणपुलाच्या खाली एका ३२ वर्षीय महिलेचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह सोमवारी (दि. १६ मार्च) सकाळी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. सुरुवातीला अत्याचार करून खून केल्याची चर्चा रंगली होती; मात्र घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर भटक्या कुत्र्यांच्या झुंडीच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली.

शोभा विजय वाघमारे (वय ३२, सध्या रा. चाकण, मूळ रा. देगलूर, जि. नांदेड) असे मृत महिलेचे नाव आहे. रविवारी मध्यरात्री सुमारे दोनच्या सुमारास त्या पुणे–नाशिक महामार्गालगत आंबेठाण चौकाजवळील उड्डाणपुलाखालील सेवा रस्त्याने जात असताना सुमारे सहा भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला.

महिलेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत दगड उचलले; मात्र कुत्र्यांच्या झुंडीसमोर ती असहाय्य ठरली. कुत्र्यांनी अंगावरील कपडे फाडून शरीरावर अनेक ठिकाणी चावे घेतले. हात, पाय, मान आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा करत सुमारे १५ मिनिटे हा हल्ला सुरू होता. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला.

सोमवारी सकाळी परिसरातील नागरिकांना विवस्त्र अवस्थेतील मृतदेह दिसताच त्यांनी चाकण उत्तर पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच चाकण उत्तर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन मोरखंडे, देवराम बुरुड, भैरोबा यादव, महेश कोळी, अक्षय सांडभोर आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांकडून महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, चाकण आणि पंचक्रोशीतील गावांमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चाकण, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, खराबवाडी परिसरात लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर कुत्र्यांचे हल्ले होत असल्याच्या घटना वाढत आहेत.

लांडगा–कुत्रा संकराचा संशय

महिलेवर हल्ला करणारी कुत्री सकाळी पुन्हा त्या ठिकाणी घिरट्या घालताना दिसल्याचे नागरिकांनी सांगितले. या कुत्र्यांचे वर्तन अत्यंत आक्रमक असल्याने कुत्रा आणि लांडगा यांच्यातील जैविक संकर असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

12 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

15 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

15 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

16 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

16 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

17 तास ago