ठाणे: ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील अस्नोली गावात आईच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. तीन मुलींच्या संगोपनाचा ताण सहन न झाल्यामुळं आईनेचं आपल्या पोटच्या तिन्ही अल्पवयीन मुलींना जेवणातून कीटकनाशक औषध देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मृत मुलींची नावे काव्या संदीप भेरे (वय 10), दिव्या संदीप भेरे (वय 8) आणि गार्गी संदीप भेरे (वय 5) अशी आहेत. या तिघींना जेवणातून विषबाधा झाल्याने तिन्ही मुलींची प्रकृती खालावल्याने वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दोन व घोटी येथील एस एम बी टी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले एक अशा तिन्ही मुलींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
आर्थिक अडचणी, मानसिक तणाव यातून केलं कृत्य
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद झाल्याने संबंधित महिला तिच्या चेरपोली येथील सासरवाडीतून माहेरी अस्नोली येथे परतली होती. तसेच आर्थिक अडचणी, मानसिक तणाव आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्यामुळे ती तणावाखाली होती. याच नैराश्यातून तिने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
किन्हवली पोलीस ठाण्यात आईच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल
या प्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात आईच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आईला अटक करण्यात आली असून किन्हवली पोलीस तपास करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, गरिबी, मानसिक आरोग्य आणि पालकत्वाच्या जबाबदाऱ्यांचा सामाजिक मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
एकाच वेळी तिन्ही बहिणींचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ
दरम्यान, एकाच वेळी तिन्ही बहिणींचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नेमकी मुलींना विषबाधा झाली की दुसरे काही आहे, याबाबतचा तपास देखील पोलिसांनी सुरु केला होता. दरम्यान, या तिन्ही मुलींच्या मृत्यूबाबत मुलींच्या आईची संशयास्पद भूमिका वाटत असल्यानं पोलिसांनी आईला ताब्यात घेतलं होतं. मुलींच्या आईची पोलिसांनी कसून चौकशी केली होती. दरम्यान, मुलींना त्रास जाणवू लागल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरु असतानाच तुन्ही मुलींचा मृत्यू झाला आहे.
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …