ठाणे: ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या आनंदआश्रमात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
दरवर्षीच्या परंपरेनुसार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सहकाऱ्यांसमवेत स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी आनंद दिघे यांच्या खोलीत जाऊन त्यांच्या वापरातील वस्तूंवर पुष्प अर्पण करत पवित्र स्मृतींना आदरांजली वाहिली.
यापूर्वी मुंबईतील शासकीय निवासस्थान ‘नंदनवन’ येथेही गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी आणि असंख्य शिवसैनिकांनी शाल, पुष्पगुच्छ आणि चाफ्याची फुले अर्पण करून उपमुख्यमंत्री शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव राम रेपाळे, उपनेते प्रकाश पाटील, ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, माजी परिवहन समिती अध्यक्ष विलास जोशी, नगरसेवक विकास रेपाळे, योगेश जानकर, जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे, प्रवक्ते राहुल लोंढे यांच्यासह ठाणे आणि राज्यभरातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना एआय, रोबोटिक्स, ड्रोन आणि थ्रीडी प्रिंटिंगचे मिळणार प्रात्यक्षिक शिक्षण; उच्च शिक्षणासाठी ठरणार उपयुक्त शिरूर…
पाणीगळती, पाणीचोरी आणि टँकरच्या काळाबाजारावर कारवाई होणार; पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांचे नळजोड तोडणार! पुणे :…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील न्हावरा रोड येथे दुचाकीवरुन पडून गंभीर जखमी झालेल्या २६ वर्षीय…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) : घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : आंबळे (ता. शिरूर) येथील अखंड हरिनाम सप्ताहातील खोले महाराज यांचा कीर्तनाचा…
कारेगाव (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात गुन्हेगारीचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नसतानाच कारेगाव येथे एका…